swapnil shinde for all india kabaddi tournament 2019 Selection in Maharashtra team kokan marathi news 
कोकण

पेंढाबे गावाचा स्वप्नील करणार वडिलांच स्वप्न पूर्ण.....

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी)  : जयपूर ( राजस्थान ) येथे होणाऱ्या ६७ व्या अखिल भारतीय कब्बडी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात पेंढाबे गावाचा सुपुत्र स्वप्नील दिलीपराव शिंदे यांची निवड झाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले. पेंढाबे येथील जेष्ठ कब्बडीपटू दिलीपराव शिंदे यांचे ठाणे येथील राज्य अजिंक्य कब्बडी स्पर्धेच्यावेळी अंतिम सामना पाहत असताना अकाली निधन झाले. रत्नागिरी जिल्हा कब्बडी संघाने विजेते पद मिळवावे आणि स्वप्नील शिंदे यांची महाराष्ट्र राज्य संघात निवड व्हावी हे त्यांचे स्वप्न होते.

मात्र वडिलांच्या निधनानंतर स्वप्नील शिंदे पूर्णपणे कोसळला त्याचवेळी दसपटी क्रीडा मंडळ अध्यक्ष प्रतापराव शिंदे यांनी त्याला सावरले आणि मायेचा हात त्याच्या पाठीवर ठेवला. त्यातून भरारी घेत आज  स्वप्नील शिंदे वडिलांचा कबड्डीचा वारसा  पुढे चालवीत आहे. दसपटी स्थानिक संघ,महिंद्रा अँड महिंद्रा व्यावसायिक संघाचा खेळाडू म्हणून कब्बडीमध्ये स्वप्नील शिंदे आपली कारकीर्द करीत आहे. तर प्रो कब्बडीमध्ये पुणेरी फलटण व दबंग दिल्ली संघातून सुद्धा खेळला आहे.

जिल्ह्याला ६७ वर्षाने अंतिम विजेते पद

  नुकत्याच चिपळूण येथे झालेल्या ६७ व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्य पद निवड चाचणी कब्बडी स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याला तब्बल ६७ वर्षाने अंतिम विजेते पद मिळवून देण्यामध्ये स्वप्नील शिंदे यांचा सिंहाचा वाटा  असून कै दिलीपराव शिंदे यांचे ते स्वप्नं सुद्धा पूर्ण झाले. तर जयपूर ( राजस्थान ) येथे अखिल भारतीय कब्बडी स्पर्धा दि 2 ते 6 मार्च दरम्यान होणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघात स्वप्नील शिंदे यांची निवड झाली. त्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे तर भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत . 

  रत्नागिरी जिल्ह्याचे,दसपतीचे नाव रोशन करणार

श्री कुलस्वामिनी देवीचा आशीर्वाद,वडिलांची पुण्याई,काका प्रतापराव शिंदे यांचे प्रोत्साहन, शिवछत्रपती पुरस्कार विजेते महिंद्रा अँड महिंद्रा  परीक्षक सागर बांदेकर व विलास जाधव सर यांनी माझ्यावर घेतलेली मेहनत आणि अनेकांचे आशीर्वाद नेहमीच लाभत असल्याने  यशस्वी शिखरे गाठू शकलो. यापुढे ही अनेकांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र संघात चांगली कामगिरी करून रत्नागिरी जिल्ह्याचे,दसपतीचे नाव रोशन करणार असल्याची प्रतिक्रिया स्वप्नील शिंदे यांनी दिली.

 स्वप्नील शिंदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT