tatkare said in guhagar when visit to patarry this industry also increased kokan industry in guhagar 
कोकण

प्रदूषणविरहित उद्योगांमुळे कोकण होणार समृद्ध ; राज्यमंत्री तटकरेच रमल्या भांडी बनविण्यात

सकाळ वृत्तसेवा

गुहागर : मातीची भांडी बनविण्याचा वेगळा उद्योग गुहागरमध्ये आकाराला येतोय, ही आनंदाची गोष्ट आहे, असे रोजगार निर्मिती करणारे, पर्यावरणपूरक आणि प्रदूषणविरहित प्रकल्प कोकणातील पर्यटन समृद्ध करतील तसेच कोकणचा आर्थिक विकासही साधतील, असे मत राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले.

धोपावे येथील भूमि पॉटरी ॲण्ड क्‍ले स्टेशनला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलत होत्या. या वेळी तटकरे यांनी मातीपासून भांडी बनविण्याचा आनंद अनुभवला. तालुक्‍यातील धोपावेतील रसिका दळींनी बनवलेल्या फोल्डींगच्या गुढीला देश, विदेशातून मागणी आली. त्यानंतर त्यांनी रंगबिरंगी पणत्यांसोबत आयुर्वेदिक उटणे, साबण असे दिवाळीच्या सणात भेट देण्याचे पॅकेट तयार केले. त्यातूनच पुढे मातीची भांडी बनविण्याच्या उद्योगाला रसिका दळींनी सुरवात केली.

खादी ग्रामोद्योगच्या वेब पोर्टलवरील भूमि पोर्टरी ॲण्ड क्‍ले स्टेशनचा व्हिडिओ पाहिल्यापासून राज्यमंत्री तटकरेंनी धोपाव्यातील या उद्योगाला भेट देण्याचे निश्‍चित केले होते. दरम्यान, दळी कुटुंबासह राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर, तहसीलदार लता धोत्रे, अजय बिरवटकर, जिल्हा खादी ग्रामोद्योगचे अधिकारी, राजा आरेकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, नगरपंचायत गटनेता उमेश भोसले, भाजप शहराध्यक्ष प्रकाश रहाटे, गटविकास अधिकारी अमोल भोसले, धोपावे सरपंच सदानंद पवार आदी उपस्थित होते.

उद्योग खाते मदत करेल

राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी धोपावे येथील प्रकल्पाला भेट दिली. या वेळी रसिका दळी यांनी प्रकल्पाची माहिती दिली. तटकरे यांनी एका मशिनवर स्वतः हातात माती घेऊन भांडी तयार करण्याचा अनुभव घेतला. भविष्यात या प्रकल्पासाठी कोणतेही सहकार्य लागल्यास उद्योग खाते नक्कीच मदत करेल, अशी ग्वाही आदिती तटकरे यांनी दिली.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government : मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका; निवडणूक आचारसंहितेपूर्वी घेतले २१ निर्णय

Maharashtra Governance : कायद्याबाहेरील कलमांवर दिला हद्दपारीचा आदेश; विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय केला रद्द!

Sakal Karandak : पुणे विभागातून ‘बीएमसीसी’ महाअंतिम फेरीत सकाळ करंडक; विभागीय अंतिम फेरीचा समारोप

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT