teacher murder in ratnagiri
teacher murder in ratnagiri 
कोकण

नशेत बरळला अन्‌ खुनाला फुटली वाचा

राजेश शेळके

सकाळचे सुमारे सात वाजले होते. एक शिक्षिका नेहमीच्या मळलेल्या पायवाटेने शाळेत निघाल्या होत्या. मात्र, सेंट्रिंगचे काम करणाऱ्या कर्नाटकातील काही नराधमांची त्यांच्यावर वाईट नजर होती, याची सुतराम कल्पनाही त्यांना नव्हती. अखेर त्या नराधमांनी डाव साधला. अंजली खेडेकर शाळेत जात असताना दबा धरून बसलेल्या सहा संशयितांनी त्यांच्यावर झडप घातली. तोंड दाबून त्यांना कॉम्प्लेक्‍समध्ये उचलून नेले. तिथे त्यांच्याबरोबर लगट करण्याचा प्रयत्न केला. अंजली यांनी तीव्र प्रतिकार करीत आरडाओरड केली. आपल्या दुष्कृत्याचे भांडे फुटणार, या भीतीने तारेने गळा आवळून त्यांचा खून केला. मृतदेह गोणपाटात गुंडाळला. त्याला चिरा बांधला आणि शौचालयाच्या टाकीत टाकला. अनेक महिने खून प्रकरणाचा छडा लागत नव्हता. पोलिस पथक कर्नाटकात संशयितांच्या मागावर होते. पोलिसांच्या सुदैवाने आणि संशयितांच्या दुर्दैवाने दारूच्या नशेत एक संशयित या खुनाबाबत बरळून गेला. खबऱ्याने ते ऐकले आणि या खून प्रकरणाला वाचा फुटली. अगदी ब्रेनमॅपिंग टेस्टपर्यंत हे खून प्रकरण गेले होते.

रत्नागिरी शहरातील मजगाव रोडलगत १४ एप्रिल २००७ ला सकाळी सातला ही घटना घडली होती. अंजली खेडेकर असे खून झालेल्या त्या शिक्षिकेचे नाव आहे. या खून प्रकरणी शहर पोलिसांनी राजू बसवराज गुरव (रा. मजगाव), बिसाप्पा यलप्पा बंडागळे (कक्केरी कर्नाटक), दत्तू बसवराज गुरव, इम्तियाज दादापीर अक्षिमणी आणि अशोक बाळकृष्ण लोहार व अन्य एक अशा सहा संशयितांना दोन ते तीन महिन्याच्या तपासानंतर अटक केली. तत्कालीन शहर पोलिस निरीक्षक आणि तपासिक अधिकारी राजीव मुठाणे यांनी मुंबईला ब्रेनमॅपिंग टेस्टसाठी नेले होते. या खुनाच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर दिलेल्या कबुली जबाबात पोलिसांना संशय निर्माण झाल्याने या चाचणीचा निर्णय घेण्यात आला होता. सहा दिवस ही चाचणी सुरू होती. त्यानंतर नार्को टेस्टचाही निर्णय झाला होता. परंतु ब्रेन मॅपिंग टेस्टमध्ये संबंधित आरोपींनी पूर्वी दिलेल्या जबाबात आणि चाचणीमध्ये साम्य आढळून आले आहे. तेव्हा खून कसा झाला हे स्पष्ट झाले. 
मजगाव येथील शिक्षिका अंजली खेडेकर या १४ एप्रिलला सकाळी सातला आंबेडकर जयंतीनिमित्त शाळेत चालल्या होत्या. मजगाव रोडलगत ज्या कॉम्प्लेक्‍सचे काम सुरू होते. तेथूनच ती पायवाट होती. मात्र येथे काम करणाऱ्या राजू गुरव आणि बिसाप्पा बंडागळे यांची तिच्यावर वाईट नजर होती. त्या दिवशी मोका साधून खेडेकर यांना त्यांनी गाठले. राजूने त्यांना पकडून तोंड दाबून धरले आणि इमारतीवर नेले. त्या ठिकाणी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र खेडेकर यांनी आत्मसंरक्षणासाठी जोरदार प्रतिकार करत आरडाओरड केली. त्या आपल्या काबूत येत नाहीत याची जाणीव झाल्यानंतर भीतीने बिस्ताप्पा याने तारेने गळा आवळून त्यांना ठार केले. त्यानंतर मृतदेह इमारतीच्या पाण्याच्या टाकीत टाकला. काही दिवसात याची कुणकूण लागणार म्हणून भीतीने त्यांनी आपले सहकारी दत्तू गुरव, इम्तियाज अक्षिमणी आणि अशोक लोहार या तिघांना मदतीला घेतले. मृतदेह टाकीतून पुन्हा बाहेर काढून गोणपाटात गुंडाळला. त्याला चिरा बांधला आणि जवळच्या पडक्‍या घराच्या शौचालयात टाकण्यात आला. दरम्यान तिच्या अंगावरील १० तोळे सोने काढून घेण्यात आले आणि आरोपी कर्नाटकला पळून गेले. काही कालावधी लोटल्यानंतर राजू गुरव आणि बिस्ताप्पा बंडाळगे हे सुस्तावले. त्यांनी मिळालेल्या दागिन्यांवर मौजमजा करण्यास सुरवात केली. दारूच्या नशेत तर्र असलेल्या या दोघांनीही आपण रत्नागिरीत खून केल्याचे तेथे काही लोकांना सांगितले. ही बातमी पोलिसांच्या माहितगाराला मिळाली. त्यांनी पोलिस निरीक्षक राजीव मुठाणे यांना ती बातमी दिली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक राऊत, पायमल आणि त्यांचे सहकारी जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रकांत उघडे व अपर पोलिस अधीक्षक सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटकला रवाना झाले. ६ जून २००७ ला हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर संशयित आरोपींना पकडण्यात आले. त्यानंतर गुन्ह्याची उकल झाली. व्यंकप्पा हळबसू चत्रबाणी यालाही यात अटक करण्यात आली. दोन वर्षांपूर्वीच या खटल्याचा निकाल लागला. यात एका संशयिताची निर्दोष मुक्तता झाली; तर उर्वरितांना जन्मठेपेची शिक्षा झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT