crime sakal
कोकण

रत्नागिरीच्या दापोलीत तीन महिला जळाल्या, घरातच मृतदेह सापडले

वणौशीतर्फे नातूच्या खोतवाडीमध्ये पस्तीस घरे असली तरी बहुतांशी बंद आहेत.

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ : दापोली तालुक्यातील वणौशीतर्फे नातू गावातील खोतवाडी येथील एकाच घरात तीन वृद्ध महिलांचे मृतदेह आढळून आले. तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये हे मृतदेह होते. तिघींचाही जळून मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. त्यांच वय अनुक्रमे ७५, ८०,९० वयोवर्षे आहे. तिघींचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकाराने दापोलीत खळबळ माजली आहे.

दापोली पोलीस चौकशी करत आहेत.सत्यवती पाटणे (७५), पार्वती पाटणे (९०) इंदूबाई पाटणे (८५) असे मृत महिलांची नावे आहेत. सत्यवती पाटणे या पडवीमध्ये चुलीजवळ जळलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यांचे डोके फुटून त्यातून रक्त वाहिल्याचे वर दिसून येते. पार्वती पाटणे या अनेक वर्षे अंथरुणाला खिळून होत्या. त्या दुसऱ्या खोलीमध्ये जळलेल्या अवस्थेमध्ये आढळून आल्या. इंदूबाई पाटणे या त्यांच्या समोरच्या घरात राहणाऱ्या त्यांच्या दुसऱ्या नातेवाईक होत्या. त्याही याच घरात बाहेरील खोलीत मृतावस्थेत आढळून आल्या. (crime news dapoli)

वणौशीतर्फे नातूच्या खोतवाडीमध्ये पस्तीस घरे असली तरी बहुतांशी बंद आहेत. येथील बहुतांश ग्रामस्थ मुंबई येथे असतात. वाडीत चार ते पाच कुटुंबेच वास्तव्याला आहेत. सत्यवती पाटणे, पार्वती पाटणे या वृद्ध महिला एका घरात राहत होत्या. त्यांच्यासमोरच्या घरात त्यांच्या नातेवाईक इंदूबाई पाटणे वाडीतील एका घरामध्ये राहायला होत्या.

किल्लीसाठी पाटणे घरात गेले

या महिलांच्यान घरासमोर एक मंदिर आहे. तेथे पूजा करण्याकरिता विनायक पाटणे रोज सकाळी येतात. त्यांना आज सकाळी या महिला दिसल्या नाहीत. मंदिराची किल्ली मागण्यासाठी ते सत्यवती पाटणेंच्या घरामध्ये गेल्या; मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी घराच्या मागील बाजूचा दरवाजा लोटला. आत गेले असता त्यांना त्या वृद्ध महिला जळालेल्या(dead body) दिसल्या. त्यांनी ही माहिती ग्रामस्थांना दिली, त्यानंतर मृतांचे मुंबईतील नातेवाईकांना कळविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT