Thermal inspection Ship from Singapore chini 22 employees kokan marathi news
Thermal inspection Ship from Singapore chini 22 employees kokan marathi news 
कोकण

चिनमधून परतलेल्या 22 जणांना जहाजात मज्जाव....

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी  (सिंधुदूर्ग) : कोरोना वायरसच्या पार्श्‍वभूमीवर जगातील प्रगत देशांनी आयात निर्यात थांबवली असताना सिंगापूर वरून आलेले जहाज रेडी बंदरावर थांबवण्या मागे कोणाचे अर्थकारण दडले असा सवाल करत जोपर्यंत जहाजावरील कर्मचाऱ्यांची तज्ञ डॉक्टरांकडून थर्मल तपासणी होत नाही तोपर्यंत या जहाजाचा बंदराशी सपर्क होऊ देऊ नका अशी मागणी आपण पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार असल्याचे शिवसेनेचे प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी सांगितले.

येथील पर्णकुटी विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ श्री परुळेकर बोलते होते ते म्हणाले 4 ते 5 फेब्रुवारी   रोजी सकाळी सिंगापूर वरून नॅथन ब्रेंडन हे जहाज रेडी बंदरवर येऊन थांबले आहे. या जहाजावर बावीस कर्मचारी असून त्यातील अधिकाधिक कर्मचारी हे चिनी आहेत. संपूर्ण जगभरात चीनमध्ये उद्भवलेल्या कोरोना व्हायरलने थैमान घातले आहे. याच धर्तीवर जागतिक आरोग्य यंत्रणेने होल्ड इमर्जन्सी नको केलेली असताना या जहाजावरील कर्मचाऱ्यांची थातुरमातुर तपासणी करून त्यांना अशा प्रकारचा कोणताही प्रादुर्भाव नाही हे सिद्ध करणे म्हणजे अत्यंत खेदजनक आहेत.

जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम नाही

जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम नसतानाही जहाजावरील कर्मचाऱ्यांना कोरोना प्रादुर्भाव नाही  हे सांगणे चुकीचे असून ताप नाही अशा व्यक्तीत हि हा व्हायरस आढळू शकतो.जगात आयात-निर्यात व्हायलाच पाहिजे मात्र लोकांचे आरोग्य तितकेच महत्त्वाचे आहे. जिल्हाधिकारी यांनी यासंदर्भात जातीनिशी लक्ष घालावे जहाजावरील कामगारांचा रेडी बंदरावरील कामगारांची संपर्क आल्यास हा व्हायरस रेडी गाव तसेच पर्यायाने जिल्ह्यातही पसरू शकतो.

थर्मल तपासणी करा

त्यामुळे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरालाॅजी (NIV) या यंत्रणेच्या तज्ञ डॉक्टरांकडून जोपर्यंत जहाजावरील कर्मचाऱ्यांची थर्मल तपासणी होत नाही तोपर्यंत संबंधित कामगारांचा बंदराशी कोणताही संपर्क येऊ देऊ नका. ते ते पुढे म्हणाले, कोरोना व्हायरस बाबत मेडिकल सायन्स कडे कोणतेही उत्तर नसताना रेडि बंदरावर थांबलेल्या जहाजावरील कामगारांची साधी तपासणी पुरेशी आहे का.? प्रगत देशांनी आपली यंत्रणा सतर्क करताना आजूबाजूच्या देशातील इंट्री बंद केली आहे.

पंचवीस देशात व्हायरसचा प्रसार

सदरचा व्हायरस हा मानवी शरीरामध्ये 14 दिवस तग धरून बसतो. पंचवीस देशात या व्हायरसचा झपाट्याने प्रसार होत आहे. एकूणच ही स्थिती लक्षात घेता जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आरोग्य यंत्रणा व पोट अधिकारी यांना याचे भान असल्यासारखे सिद्ध होते. त्यामुळे संबंधित जहाजावरील कर्मचाऱ्यांची रक्त चाचणी करणे गरजेचे आहे.सदरची जहाजे ही सिंगापूर मलेशिया आधी प्रादुर्भाव झालेल्या देशांमध्ये फिरून आलेली असून सदरची तपासणी हे संशयाच्या दृष्टीनेच केली पाहिजे.

शास्त्रीय दृष्टिकोनातून तपासणी गरजेची

डॉक्टर परुळेकर म्हणाले, इथल्या ग्रामस्थांचे नागरिकांचे आरोग्य स्वस्त नाही एकूणच गांभीर्य लक्षात घेता थातूरमातूर तपासणी योग्य नसून शास्त्रीय दृष्टिकोनातून तपासणी होऊन त्यांना संबंधित व्हायरसचा कोणतेही प्रादुर्भाव नाही हे सिद्ध झाल्यावरच त्यांचा बंदराचे थेट संपर्क करण्यास कोणतीही हरकत नाही. त्यामुळे आपण तात्काळ या संदर्भात पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी त्यांचे लक्ष वेधणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT