Corona esakal
कोकण

रत्नागिरीत तीन बालकांची कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटवर मात

- राजेश शेळके

रत्नागिरीत तिसऱ्या लाटेपूर्वीच जिल्ह्यात 3 हजार मुले कोरोना बाधित; एकाचा मृत्यू

रत्नागिरी: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये (covid 19 Third wave) जास्तीत जास्त मुले बाधित होण्याची शक्यता आरोग्य विभागने वर्तविली आहे. मात्र जिल्ह्यात दुसऱ्या लाटेतच सुमारे ३ हजार मुले कोरोना बाधित (3,000 children corona infected)झाली. विशेष म्हणजे जिल्ह्यातील मुलांची प्रतिकार क्षमता चांगली असल्याने त्यांनी या महामारीवर यशस्वी मात केली. मात्र एका १० वर्षांच्या मुलाचा यात मृत्यू झाला. तर समाधानाची बाब म्हणजे ३ चिमुकल्यांनी डेल्टा व्हेरिएंटवर या कोरोमानाच्या नव्या स्ट्रेनवर मात केली आहे. मुलांना सकस आहार देऊन विशेष काळजी घेतल्याने हे शक्य झाले आहे, असा विश्वास जिल्हा शल्य चिकित्सक संघमित्रा फुले यांनी व्यक्त केला. पालकांनी यापुढे मुलांबाबत सतर्क राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. (District Surgeon Sanghmitra Phule) (three-children-overcoming-delta-plus-variant-of-corona-in-ratnagiri-covid-19-update-news)

जिल्ह्यातील बालके कोरोनाच्या विळख्यात येताना दिसत आहेत. एप्रिल आणि मे या दोन महिन्यात जिल्ह्यात २ हजार ९०८ मुलांना कोरोनाची बाधीत झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. यामध्ये ० ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश होती. समाधानकारक बाब म्हणजे मुलांमध्ये चांगली प्रतिकारक्षमता असल्याने सर्व मुलानी कोरोनावर मात केली आहे. जून महिन्यात ७० ते ८० मुलो कोरोना बाधित होती. या मुलांमध्ये सर्दी, ताप, अशी लक्षणे आढळून आली. मात्र घाबरण्याची आवश्यकता नाही. पालकांनी योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे.

संगमेश्वर तालुक्यातील डेल्टा व्हेरिएंटचे ९ रुग्ण आढळून आले होते. उपचारानंतर हे ९ जण बरे होऊन घरी गेले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे डेल्टा व्हेरिएंटची लागण झालेल्या तीन बालकांचा यामध्ये समावेश होता. ३ वर्षे, ४ वर्षे आणि ६ वर्षांच्या बालकांना डेल्टा व्हेरिएंट कन्सर्न होता. मात्र त्यांनी त्यावरही मात केली आहे. लहान मुलांमध्ये डेल्टा व्हेरिएन्ट आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आम्ही योग्य ती खबरदारी घेतली आहे. मात्र पालकांनीही काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी केले.

एप्रिल, मे महिन्यातील कोरोना बाधितांची संख्या

तालुका बालकांची संख्या

मंडणगड ३०

दापोली १७८

खेड २१९

गुहागर २६१

चिपळूण ५५७

संगमेश्वर ४२६

रत्नागिरी ८३४

लांजा १८६

राजापूर २१७

एकूण २९०८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT