Three Dead In Chire Carrying Truck Accident In Ratngiri Taluka  
कोकण

चिरे वाहणारा ट्रक आंब्याच्या फांदीला धडकून उलटला अन् ...

सकाळ वृत्तसेवा

पावस ( रत्नागिरी ) - मावळंगे नातुंडेवाडी येथे चिरे वाहतूक करणारा ट्रक उलटून चिरे अंगावर पडल्याने तीन कामगार ठार झाले. गाडी मालकासह अन्य चौघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. 

सुधाकर कृष्णा लाखण (वय 48), अजय लाखण (27, दोघेही रा. शिवारआंबेरे) या सख्ख्या भावांसह गोरख मोहन काळे (वय 32, रा. नगर) अशी मृतांची नावे आहेत.ओमकार विश्वनाथ खानविलकर (वय 25), सूर्यकांत गोविंद पाजवे (50), यशवंत गोसावी (40), दिलीप नमसले (45, सर्व रा. शिवारआंबेरे) हे चौघे जखमी आहेत. मावळंगे नातुंडेवाडी येथून विश्वनाथ खानविलकर यांच्या मालकीच्या ट्रकमधून चिरे भरुन ते मोरया सडा येथे जात होते.

आंब्याच्या फांदीला धडकून अपघात

नातुंडेवाडीजवळ वळणावर ट्रकला आंब्याच्या झाडाची फांदी लागली. त्यामुळे ट्रक रस्त्यावरून खाली उतरला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्ता सोडून खाली कोसळला. एकूण सात कामगार ट्रकमध्ये होते. त्यापैकी हौद्यामध्ये काही कामगार बसले होते. ट्रक उलटल्याने ट्रकच्या हौद्यात चिऱ्यावर बसलेल्या तीन कामगारांच्या अंगावरच चिरे कोसळले. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. ओमकार विश्वनाथ खानविलकर, सूर्यकांत गोविंद पाजवे, यशवंत गोसावी, दिलीप नमसले हे जखमी आहेत. यातील सूर्यकांत पाचवे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाले असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळतात उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. अपघातानंतर जखमींना ग्रामस्थांनी आपल्या गाड्यांमधून रुग्णालयापर्यंत पोचविले. अपघाताचे वृत्त शिवारआंबेरे परिसरात पोहचताच ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. पूर्णगड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जावून पंचनामा केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: पुढील तीन दिवस महत्त्वाचे! मुसळधारेसह भरतीचा इशारा; हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Vanjari Reservation: मराठा आरक्षणासारखा वंजारी समाजाचा प्रश्न सुटणार का? ST मध्ये असल्याचा महत्त्वाचा पुरावा सापडला

Kolhapur Attack : विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या कोल्हापुरातील सायबर चौकात प्राणघातक हल्ला,पार्टीच्या वादातून मित्रांमध्ये वाद

MLA Rohit Pawar: सर्वसामान्यांना त्रास दिल्यास गय नाही: आमदार रोहित पवार; आपण जनसेवक आहोत विसरु नका, तीन हजार परत करायला लावले

Dermatitis Spread: 'साेलापूर शहरात टिनिया, कॅन्डिडासह त्वचेच्या विकारांत होतेय वाढ'; शहरात अतिवृष्टी, घाण पाणी अन् ओलाव्याचा परिणाम

SCROLL FOR NEXT