कोकण

खेड ः भगवा झेंडा फाडणाऱ्यांना उद्धव पक्षात घेतात

CD

संजय कदमांचा ठाकरे शिवसेनेतील
प्रवेश ही राजकीय आत्महत्याच
योगेश कदम; दापोलीतील मार्ग प्रशस्त झाल्याचा दावा
खेड, ता. २४ ः माजी आमदार संजय कदम यांचा उद्धव ठाकरे शिवसेनेतील प्रवेशाचा निर्णय ही त्यांची राजकीय आत्महत्या आहे. त्यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाने मतदार संघातील माझा मार्ग आणखी प्रशस्त झाला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार योगेश कदम यांनी दिली.
दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी आज येथे पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादीचे नेते, माजी आमदार संजय कदम यांनी माजी मंत्री रामदास कदम व आमदार योगेश कदम यांच्यावर शुक्रवारी (ता. २०) पत्रकार परिषद घेऊन टीका केली होती. व आपला उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेश निश्चित असल्याचे जाहीर केले. त्यांच्या टीकेला उत्तर देताना आमदार योगेश कदम म्हणाले,‘ संजय कदम यांनी खेडच्या तीनबत्ती नाक्यात भगवा झेंडा व पक्षाचे बॅनर फाडले होते. हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विसरले का? संजय कदम यांचा प्रवेश ही दोन वर्ष सुरू असलेली चर्चा आहे. या मतदारसंघात माजी आमदारांचे आव्हान मी समजतच नाही. दापोली मतदार संघातील कार्यकर्ते सदैव बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत राहिला आहे. मुळात संजय कदम २०१३ मध्ये ज्या वेळी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर पुन्हा संजय कदम सारखी व्यक्ती जेव्हा वारंवार पक्षांतर करते त्या व्यक्तीची समाजातील विश्वासार्हता संपते. संजय कदम यांचा हा निर्णय राजकीय दृष्टिकोनातून हुशारीचा नसून, ही त्यांची राजकीय आत्महत्या आहे. मी त्यांच्या प्रवेशाची वाटच बघतो आहे. त्यामुळे माझा पुढील वाटचालीचा मार्ग आणखी प्रशस्त होईल, असा विश्वासही आमदार कदम यांनी या वेळी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local : गर्दुल्यांकडून मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! दिवसाढवळ्या घडला धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT