कोकण

वेताळबांबर्डे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

CD

79405
वेताळ बांबर्डे ः येथील शाळा क्रमांक १ च्या वार्षिक स्नेहसंमेलनात सामाजिक कार्यकर्ते एस. पी. सामंत यांचा सत्कार करण्यात आला. बाजूला गटविकास अधिकारी विजय चव्हाण.

वेताळबांबर्डे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात
कुडाळ, ता. ३१ ः जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा वेताळबांबर्डे क्रमांक १ चे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ येथील पटांगणात निमंत्रित मान्यवर, पालक, ग्रामस्थ, प्रशालेतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत जल्लोषात झाला.
यावेळी व्यासपीठावर बाव येथील उद्योजक एस पी सामंत, सावंतवाडी येथील उद्योजक शैलेश पै, कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण, शिक्षणाधिकारी ( प्राथ. योजना विभाग, सिंधुदुर्ग) प्रदीप कुडाळकर, उपशिक्षणाधिकारी शोभराज शेरलेकर, एकलव्य शिक्षण व आरोग्य न्यास संस्थेच्या संचालिका श्रीमती रेणू गावस्कर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जे के. घाडी, शिक्षणतज्ञ प्रदीप गावडे, केंद्रप्रमुख बी. व्ही. तळेकर, प्रशालेचे माजी मुख्याध्यापक पी. एस. सावंत, वेताळबांबर्डे गडकरी शाळेच्या उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्रीमती रश्मी सावंत, पदवीधर शिक्षिका श्रीमती स्नेहल सावंत हे मान्यवर उपस्थित होते.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ घाडी यांच्या हस्ते उपस्थित विशेष अतिथींचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक शंकर गोसावी यांनी प्रास्ताविक व शैक्षणिक कामकाजाचे अहवाल वाचन केले. मान्यवरांच्या हस्ते विविध शालेय स्पर्धा मधील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. माजी मुख्याध्यापक श्री. सावंत यांचा श्री. चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सन्मानपत्र देण्यात आले. श्री. चव्हाण यांनी कार्यक्रमातील पालकांच्या उपस्थितीबाबत आनंद व्यक्त केला तसेच मराठी शाळांनी आपला दर्जा आजही टिकवून ठेवला आहे असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT