कोकण

पतसंस्था कर्मचाऱ्यांसाठी वेंगुर्लेत प्रशिक्षण

CD

देवगड तालुक्यात उकाड्याची चाहूल
देवगड ः तालुक्याच्या किनारी भागात वारा सुटला होता. सकाळच्यावेळी थंडी तर दुपारनंतर उष्णतेत वाढ होत असते. त्यामुळे आगामी उकाड्याची चाहूल लागली आहे. किनारी भागात जोराचा वारा सुटत असल्याने वातावरण बदलाचे संकेत मिळत आहेत. मध्यंतरी किनारी भागात जोराची थंडी जाणवत होती. तसेच रात्रीच्यावेळी दवाचे प्रमाणही वाढले होते. सध्या पहाटेच्यावेळी वातावरणात गारवा जाणवत असतो. बोचरा वारा सुटत असल्याने थंडी जाणवते. त्यातच दुपारी उष्णतेत वाढ होत असल्याचे चित्र आहे. दोन दिवसापासून किनारी भागात जोराचा वारा सुटत आहे. त्यामुळे रोजच्या बदलत्या वातावरणाचा अनुभव स्थानिक घेत आहेत. वाऱ्यामुळे मासेमारी हंगामावरही त्याचा परिणाम जाणवत असल्याचे चित्र आहे. उष्णतेत वाढ होत असल्याने उकाडा जाणवत आहे. त्यामुळे वातावरण बदलाचे संकेत मिळत आहेत.
--
पतसंस्था कर्मचाऱ्यांसाठी वेंगुर्लेत प्रशिक्षण
सावंतवाडी ः सहकारी पतसंस्थांच्या कामकाजाबाबत महाराष्ट्र नियामक मंडळाने वेगवेगळे निकष लावले आहेत. या निकषांबाबत व पतसंस्थांच्या कामकाजाबाबत कर्मचाऱ्यांना सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी पतसंस्था फेडरेशनने पतसंस्थांच्या कार्मचाऱ्यांसाठी १६ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत तीन दिवशीय ‘पतसंस्था प्रशिक्षण’ शिबिराचे आयोजन वेंगुर्ले नगरवाचनालय, रामेश्वर मंदिरजवळ येथे केले आहे. या प्रशिक्षण शिबिरात पतसंस्था व्यवस्थापन, कर्ज व्यवस्थापन, कर्ज वसुली या व इतर महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी सहकारातील तज्ज्ञ व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. पतसंस्थांनी जास्तीत जास्त कार्मचाऱ्यांना या प्रशिक्षणासाठी पाठवून प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष पीटर डॉन्टस यांनी केले आहे.
---
देवगड येथे गजानन महाराज प्रकटदिन
देवगड ः तालुक्यात ठिकठिकाणी श्री संत गजानन महाराज प्रकटदिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील मंदिरात भाविकांनी दर्शन घेतले. मंदिरात भाविकांची ये -जा सुरू होती. तालुक्यातील नारिंग्रे येथेही प्रकटदिन कार्यक्रम झाला. त्याठिकाणी दुपारी महाप्रसादाचे वाटप झाले. तसेच रात्री डबलबारी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, तालुक्यातील अन्य ठिकाणीही उत्सव साजरे झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local : गर्दुल्यांकडून मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! दिवसाढवळ्या घडला धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT