कोकण

मंडणगड-सुधारित बातमी

CD

rat०२१९.txt

बातमी क्र. .१९ (टुडे २ साठी)
(टीप- यापूर्वीची बातमी रद्द करून ही बातमी घ्यावी)

- Rat२p२८.jpg ः
८६३७५
मंडणगड ः महाविद्यालयात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे डॉ. राजेश रासम, सोबत इतर मान्यवर.

मराठी विकिपिडिया अधिकाधिक समृद्ध करूया

डॉ. राजेश राजम; मुंडे महाविद्यालयात मराठी भाषा दिन साजरा

मंडणगड, ता. २ ः विकिपीडिया हा ज्ञानकोश व माहितीचा स्रोत आहे. त्यातील मराठी नोंदींचे लेखन करून मराठी विकिपीडिया समृद्ध करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन येथील ग्रंथपाल डॉ. राजेश राजम यांनी केले.
लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाअंतर्गत मराठी वाङ्मय मंडळ आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विकिपिडियावरील मराठी नोंदींचे लेखन या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यशाळेला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर उपस्थित होते. या वेळी मराठी विभागप्रमुख प्रा. संजयकुमार इंगोले यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. डॉ. संगीता घाडगे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ. राजम म्हणाले, इंग्रजी किंवा अन्य भारतीय भाषांच्या तुलनेत विकिपिडियावरील मराठी भाषेतील लेखांचे प्रमाण अत्यल्प आहे. मराठी ही आपली मातृभाषा असून, प्रत्येकाने यावर विविध अंगांनी लेखन व संपादन करून त्यामध्ये अधिकाधिक भर घातली पाहिजे. यासाठी प्रथम विकिपिडियावर स्वतःचे खाते उघडावे व नवीन लेखन तसेच उपलब्ध माहितीमध्ये आपल्यापरीने संपादन करून आपले योगदान द्यावे व आपली माहिती इंटरनेटवर प्रकाशित करावी; मात्र आपले लेखन एकांगी असू नये, याचीही दक्षता घ्यावी.

या प्रसंगी पीपीटीच्या माध्यमातून व इंटरनेटच्या साहाय्याने विकिपिडियावर खाते उघडणे व त्यावर नोंदी करण्याबाबतचे प्रात्यक्षिक डॅा. राजम यांनी दाखवले. तांत्रिक सहाय्यक म्हणून प्रा. सुरज बुलाखे व डॉ. महेश कुलकर्णी यांनी काम पाहिले. कार्यशाळेस शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संगीता घाडगे यांनी तर आभार डॉ. अशोक साळुंखे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT