कोकण

अनुभवी कामगार बदलू नयेत

CD

89660
आनंद लाड

अनुभवी कामगार बदलू नयेत

उपआयुक्त भोसले; वीज कंपन्यांना सूचना

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १७ ः कंत्राटदार बदलले तरी कामगार बदलू नयेत, अशा सूचना कामगार उपआयुक्त संतोष भोसले यांनी वीज कंपनीला दिल्याची माहिती महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे जिल्हाध्यक्ष (संलग्न भारतीय मजदूर संघ) आनंद लाड यांनी दिली.
याबाबत लाड यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील मंजूर रिक्त विविध पदांवर काम करत असलेल्या अनुभवी वीज कंत्राटी कामगारांना कंत्राटदार एजन्सीकडून होत असलेल्या आर्थिक जाच व रोजगार विषयक विविध समस्यांबाबत महाराष्ट्राचे कामगार उपायुक्त भोसले यांनी १५ मार्चला मुंबई येथील कार्यालयात तिन्ही वीज कंपन्या व संघटना प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी महाराष्ट्राचे कामगार उपायुक्त भोसले, सुहास कदम, प्रशासनातर्फे महावितरणचे संजय ढोके, महापारेषणचे भरत पाटील व महानिर्मितीच्या रुपाली वळुंज व संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, संघटनमंत्री उमेश आनेराव, उपाध्यक्ष सचिन भावसार व मोहन देशमुख उपस्थित होते. न्यायालयाने सुमारे ७००० कामगारांना कामावरून कमी करू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत; मात्र याचे पालन प्रशासन व कंत्राटदार करत नसल्याने संघटनेला वारंवार आंदोलने करावी लागतात, अशा व अन्य तक्रारी संघटनेने केल्या. चर्चेअंती कामगार उपायुक्त भोसले यांनी तिन्ही वीज कंपनी प्रशासनाला सूचना दिल्या. यात कंत्राटदार बदलले तरी कामगार तेच जुने व अनुभवी राहतील, याची काळजी घ्यावी. कामगाराच्या अपराधाची शहानिशा होऊन नियंत्रण अधिकाऱ्यांनी सांगितल्याशिवाय कंत्राटदाराने परस्पर कामावरून कमी करू नये. औद्योगिक न्यायालयाने रोजगारात संरक्षण दिलेल्या सर्व कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे व त्या सर्व याद्या प्रत्येक ऑफिसला द्याव्यात, यासह इतर बाबींचे काटेकोर पालन प्रशासनाने कंत्राटदारांकडून करून घ्यावे; अन्यथा कारवाईचा इशारा उपआयुक्त भोसले यांनी दिल्याचे म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT