कोकण

दाभोळ-माजी उपनगराध्यक्ष पुसाळकरांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश

CD

-rat१९p२७.jpg-P२३L९००५९
दापोली : माजी उपनगराध्यक्ष प्रशांत पुसाळकर ठाकरे गटात प्रवेश केल्यावर त्यांचे स्वागत करताना माजी आमदार संजय कदम.

माजी उपनगराध्यक्ष पुसाळकर ठाकरे शिवसेनेत
दाभोळ, ता. २० : गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू असून आहे. शिवसेनेतील आमदार योगेश कदम यांचे समर्थक आणि दापोली नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत पुसाळकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात पक्ष प्रवेश केल्याने दापोलीत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ५ मार्च रोजी जंगी सभा झाली होती. त्यानंतर आमदार योगेश कदम गटातील दापोलीचे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत पुसाळकर यांनी ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे. दापोली नगरपंचायतीमध्ये शिवसेना (कदम गट) व कॉंग्रेस यांची सत्ता असताना प्रशांत पुसाळकर हे कॉंग्रेसचे नगरसेवक उपनगराध्यक्ष होते. नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यावर त्यांनी कॉंग्रेसला रामराम करून शिवसेनेत प्रवेश केला होता. नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेची सर्व सूत्रे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे गेल्याने आमदार योगेश कदम यांच्या गटातील उमेदवारांनी शिवसेवा विकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढविली होती. या आघाडीतून प्रशांत पुसाळकर यांनीही निवडणूक लढविली, मात्र ते पराभूत झाले होते. प्रशांत पुसाळकर यांनी माजी आमदार सूर्यकांत दळवी व माजी आमदार संजय कदम यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT