कोकण

सावंतवाडी आगारास दहा नव्या बसेस

CD

91816
सावंतवाडी : येथील एसटी बसस्थानकास मिळालेल्या नव्या गाड्यांचे लोकार्पण करताना मंत्री दीपक केसरकर. बाजूला एसटी अधिकारी व पदाधिकारी. (छायाचित्र ः रुपेश हिराप)


सावंतवाडी आगारास दहा नव्या बसेस

सहा बस दाखल; मंत्री केसरकरांच्या हस्ते लोकार्पण

सावंतवाडी, ता. २७ ः येथील एसटी आगाराला शासनाकडून दहा नव्या बसेस मंजूर झाल्या आहेत. पैकी सहा आज स्थानकात दाखल झाल्या. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या नवीन बसेसचे लोकार्पण केले. त्यानंतर नव्या लालपरीत बसून त्यांनी शहरात फेरफटकाही मारला. महिलांसाठी एसटीत ५० टक्के आरक्षण दिल्यानंतर भारमानात वाढ झाली आहे. त्यामुळे या निर्णयाचा फायदा एसटीची आर्थिक परिस्थिती बदलण्यास निश्चित होईल, असा आशावादही मंत्री केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी एसटी आगाराचे अधिकारी नरेंद्र बोधे, राम वाडकर आदींसह शिवसेना तालुकाप्रमुख बबन राणे, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, आबा केसरकर, नंदू शिरोडकर, नंदू गावडे, अनारोजीन लोबो, भारती मोरे, सुरेंद्र बांदेकर, नीता सावंत, नीलिमा चलवाडी, परशुराम चलवाडी आदी उपस्थित होत्या. यावेळी मंत्री केसरकर म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात असलेले भाजप आणि शिवसेनेचे सरकार हे गतिमान सरकार आहे. या सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाबाबत दिलासा दिल्यानंतर एसटी महामंडळ फायद्यात येण्यासाठी प्रत्येक एसटी आगाराला नव्या बसेस दिल्या आहेत. सावंतवाडी आगारासाठी दहा नव्या बसेस मंजूर झाल्या असून पैकी सहा बसेस येथे दाखल झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना नव्या बसेसमधून सुलभ आणि सुखद प्रवास करता येणार आहे. शिवाय रात्रीच्या वेळी कर्तव्य बजावून येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी योग्य ती व्यवस्था व्हावी, यासाठी आवश्यक सुविधा दिल्या जाणार आहेत. एसटी बसमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण दिल्यानंतर हक्काच्या महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. एरवी सहाआसनी व खासगी गाड्यांतून प्रवास करणाऱ्या महिला आता एसटीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे एसटीचे भारमान वाढून आर्थिक फायदा होणार आहे. राज्याचा हा निर्णय नक्कीच एसटीची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर ठरणार आहे.’’
..............
चौकट
नव्या इमारतीचे काम लवकरच
सावंतवाडी एसटी बसस्थानकाच्या नव्या इमारतीचे काम रखडले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या बजेटमध्ये त्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. त्यामुळे हे कामही लवकरच मार्गी लागणार आहे. येत्या काही दिवसांत यासाठी मुंबईत बैठक घेऊन या कामाला चालना दिली जाणार आहे, अशी माहिती मंत्री केसरकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT