कोकण

शिकारीच्या उद्देशाने फिरणाऱ्या चौघांना कडावलमध्ये पकडले

CD

98116
कुडाळ ः संशयितांकडून ताब्यात घेतलेल्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पथक.


शिकारीच्या उद्देशाने फिरणाऱ्या
चौघांना कडावलमध्ये पकडले

बंदुका जप्त; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

कुडाळ, ता. २३ ः शिकारीच्या उद्देशाने बंदूक घेऊन फिरणाऱ्या येथील चौघांना आज स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने कडावल बाजारपेठेत ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन बंदुकांसह १३ जिवंत काडतुसे, मोटार आणि दुचाकी असा सुमारे ६ लाख १४ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई आज सकाळी साडेपाचच्या सुमारास करण्यात आली.
जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांचा वापर करून प्राण्यांची शिकार करून त्यांच्या अवयवांची विक्री व तस्करी करणाऱ्या व्यक्तींची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी आदेश दिले आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने अपर पोलिस अधीक्षक नितीन बगाटे हे वेळोवेळी आढावा घेऊन मार्गदर्शन करत आहेत.
पोलिस अधीक्षक अग्रवाल यांच्या आदेशान्वये पोलिस निरीक्षक संदीप भोसले (स्थानिक गुन्हे शाखा, सिंधुदुर्ग) यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांची पथके तयार करून जिल्ह्यातील अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींवर पाळत ठेवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमलदारांना पांग्रड जंगलात कुडाळ येथील काही व्यक्ती मोटार व दुचाकीने जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी गेले असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र घाग, सहायक पोलिस उपनिरीक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलिस हवालदार प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, प्रमोद काळसेकर, पोलिस अंमलदार प्रथमेश गावडे, यशवंत आरमारकर यांनी कडावल बाजारपेठेत सापळा रचून आज पहाटे साडेपाचच्या सुमारास पांग्रड येथून कुडाळकडे जाणारी मोटार व दुचाकी तपासणीसाठी थांबविली. या वाहनांतील चौघांची तपासणी केली असता त्यांच्याकडे दोन काडतूस बंदुका, तेरा जिवंत काडतुसे सापडली. त्या चौघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मोटार, दुचाकी, दोन बंदुका व अन्य साहित्य असा सुमारे ६ लाख १४ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संशयितांविरुद्द येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. कुडाळ पोलिस ठाण्यामार्फत अधिक तपास सुरू आहे. अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींची माहिती असल्यास त्याबाबत पोलिसांना कळविण्यात यावे, असे आवाहन सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या वतीने पोलिस अधीक्षक अग्रवाल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT