कोकण

मराठी शाळा वाचवायला पुढे या

CD

01634
तळकट : शतक महोत्सवी कार्यक्रमात बोलताना खासदार विनायक राऊत. शेजारी अतुल रावराणे, बाबुराव धुरी, बाळा गावडे, संजय गवस, सुरेंद्र सावंत, दुर्गाराम गवस, एकनाथ नाडकर्णी, संपदा देसाई आदी.

मराठी शाळा वाचवायला पुढे या

खासदार विनायक राऊत; तळकटमध्ये शाळा शतक महोत्सवाचा समारोप

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ ः जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेऊन आमच्यासारखे अनेक विद्यार्थी घडले. आपला आणि गावाचा नावलौकिक वाढविला; पण आज इंग्रजी माध्यम शाळांमुळे जिल्हा परिषद शाळांसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालक-शिक्षकांनी जिल्हा परिषद शाळा वाचविण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी तळकट (ता. दोडामार्ग) येथे केले.
तळकट येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ चा शतक महोत्सव समारोप कार्यक्रम रविवारी (ता. ७) उत्साहात झाला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, संपर्कप्रमुख शैलेश परब, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अतुल रावराणे, जिल्हा परिषद माजी सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, तालुकाप्रमुख संजय गवस, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, माजी पंचायत समिती सदस्य संपदा देसाई, सरपंच सुरेंद्र सावंत, माजी सरपंच रामचंद्र सावंत, शतक महोत्सव समितीचे अध्यक्ष दुर्गाराम गवस, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास देसाई, नारायण देसाई, दीपक देसाई, बाबाजी झेंडे, मुख्याध्यापक अरुण पवार, गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक, बाबा देसाई आदी उपस्थित होते.
खासदार राऊत म्हणाले, ‘‘जिल्हा परिषद आणि अन्य मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकून अनेक विद्यार्थी घडले. मोठ्या पदापर्यंत गेले; मात्र आज इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळे मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद असो की अन्य मराठी माध्यमाच्या शाळा टिकणे गरजेचे आहे. त्यासाठी पालक आणि शिक्षकांनी सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे.’’
बाबुराव धुरी म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील बऱ्याच शाळा ब्रिटिश कालखंडात सुरू झाल्या. आपल्या पूर्वजांनी आपल्या शिक्षणाची व्यवस्था गावातच केली. त्यातूनच आपण घडलो, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. शिक्षण हे व्यक्तिमत्व विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असते.’’ दुर्गाराम गवस यांनी शतक महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या उपक्रमांबाबत माहिती दिली. यावेळी आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत बाबाजी झेंडे, रामदास देसाई, सरपंच सावंत यांनी केले. यावेळी शरद धुरी, विजय देसाई, संतोष देसाई, विष्णू देसाई, दीपक मळीक आदींसह ग्रामस्थ आणि मुंबई मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
--
पूर्वजांचा ठेवा जपायला हवा
खासदार राऊत म्हणाले, ‘‘शाळा वाचविण्यासाठी एकत्रित प्रयत्न व्हावेत. जिल्ह्यात १६५ वर्षे झालेल्या दोन शाळा, दीडशे वर्षे पूर्ण झालेल्या दहा, शंभर वर्षे पूर्ण झालेल्या पन्नास शाळा असून त्यामध्ये तळकट शाळेचा समावेश आहे. ग्रामस्थांच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे. पूर्वजांनी आपल्या शिक्षणाची सोय कठीण परिस्थितीत केली. त्याची जाण प्रत्येकाने ठेवली पाहिजे. जिल्हा परिषद शाळेसाठी सर्वतोपरी मदत माझ्याकडून होईल. आपण कितीही मोठे झालो तरी गावाला विसरता कामा नये. सण, समारंभाला गावी येऊन ग्रामस्थ, शेजारी यांच्याशी संवाद साधला पाहिजे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT