कोकण

एसटी कर्मचाऱ्याच्या निलंबन नोटीसीमुळे चालकांचे ‘काम बंद’

CD

एसटी कर्मचाऱ्याच्या निलंबन
नोटीसीमुळे चालकांचे ‘काम बंद’

मालवण आगारात तासभर प्रवासी ताटकळले

मालवण, ता. १७ : येथील एसटी आगारातील एका कर्मचाऱ्याला आगारातील प्रमुख अधिकाऱ्यांनी बडतर्फ करण्याची नोटीस दिल्याने आगारातील एसटी कर्मचारी आक्रमक बनले. त्यांनी सायंकाळी साडेसहानंतर एसटी बसेस चालविण्यास नकार दिला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईला जाण्यासाठी आगारात आलेल्या प्रवाशांची गैरसोय झाली. रेल्वेसाठी जाणाऱ्या प्रवाशांनी तर एसटीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी प्रमुख अधिकारी उपस्थित नसल्याने स्थानक प्रमुखांनाच प्रवाशांच्या रोषास सामोरे जावे लागले.
दरम्यान, विभाग नियंत्रक श्री. पाटील यांनी मालवण आगारातील कर्मचाऱ्यांशी चर्चा करून प्रवाशांची गैरसोय होवू नये यासाठी एसटी फेऱ्या सुरू करण्याची सूचना दिली आणि संबंधित कर्मचाऱ्यावर केलेल्या कारवाईबाबत उद्या चर्चा करू, अशी ग्वाही दिल्याने कर्मचाऱ्यांनी तातडीने एसटी फेऱ्या सुरू केल्या; मात्र यात सुमारे एक तास प्रवासी वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागला. मालवण एसटी आगारातील एका कर्मचाऱ्याला आगारातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या आदेशाने निलंबीत केले होते. ही कारवाई आज सायंकाळी झाली. या आदेशाची प्रत एसटी आगाराच्या एका भिंतीवर लावली होती. ही नोटीस वाचल्यानंतर कर्मचारी वर्ग आक्रमक बनला. त्यांनी सायंकाळनंतर एकत्रित येत एसटी फेऱ्यांवर न जाण्याचा निर्णय घेत जोपर्यंत निलंबन कारवाई मागे घेण्यात येत नाही आणि सक्षम अधिकारी चर्चेसाठी येत नाही तोपर्यंत बसस्थानकावर थांबण्याचा निर्णय घेतला. स्थानक प्रमुखांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली; मात्र कर्मचाऱ्यांनी भूमीका स्पष्ट करत प्रमुख अधिकाऱ्यांनी चर्चेला यावे, असे सांगितले. मात्र एक तास होत आला तरी कोणतीही चर्चा न झाल्याने कर्मचारी अधिकच आक्रमक बनले होते. मुंबईला रेल्वेने जाण्यासाठी कुडाळ व कणकवली याठिकाणी जाण्यासाठी येथील बसस्थानकावर प्रवासी मोठ्या संख्येने आला होता. बहुतांशी प्रवासी वर्ग हा मुंबईकर चाकरमानी होता. रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या गाड्याच थांबल्याने प्रवासी वर्ग अधिकच आक्रमक बनला. काही प्रवाशांनी तर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत स्थानकप्रमुखांनाही खडेबोल सुनावले. तसेच आंदोलनात्माक पवित्रा घेण्यात येईल, असा इशारा दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT