कोकण

7 पट पैसे देण्याचे आमिष दाखवून 62 लाखाला गंडा

CD

३८ (पान १ साठी)

सात पट परताव्याच्या अमिषाने
एकास ६२ लाखांचा गंडा

११ जणांवर गुन्हा ; संबधितांचा शोध सुरू


रत्नागिरी, ता. २२ ः अनोळखीने व्हॉटसअप ग्रुपला समाविष्ट करुन फिर्यादींना ट्रेडिंग अकाऊंट उघडण्यास सांगून त्यामध्ये गुंतवलेल्या रक्कमेवर सात पट परतावा देतो असे अमिष दाखवले. त्याआधारे ६२ लाखांहून अधिकची फसवणूक केली. या प्रकरणी ११ जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील वासू बाबूलाल, संजय अण्णासाहेब कांबळे, संतोष एन्टरप्रायजेस, रविंद्र उद्धवराव शिंदे, झेफगोल्ड ऑनलाई कंपनी व पाच अज्ञात मोबाईल धारक (नाव, पत्ता, माहित नाही) अशी संशयितांची नावे आहेत. हा प्रकार २२ फेंब्रुवारी ते २९ एप्रिल २०२३ या कालावधीत सिद्धीविनायक, शिवाजीनगर, रत्नागिरी येथे घडला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फेंब्रुवारीत फिर्यादी यांना त्यांच्या मोबाईलवर अनोळखी मोबाईल धारकाने त्यांना वेल्थ पासवर्ड ३१४१ या व्हॉटसअप ग्रुपवर समाविष्ट केले. त्यानंतर ग्रुपवर रजिस्ट्रेशन लिंक पाठवून ट्रेडिंग अकाऊंट ओपन करण्यास सांगितले. फिर्यादी यांनी त्यांची पत्नीच्या नावे ट्रेडिंग अकाऊंट उघडले. संबधिताने फिर्यादी यांना त्यांनी गुंतवलेल्या रक्कमेच्या सात पटीने परतावा दिला जाईल असे सांगितले. फिर्यादींचा विश्वास संपादन करुन बॅक खात्यातून संशयितांनी ६२ लाख ४६ हजार रुपयांची ट्रान्स्फर करावयास सांगितले. त्यानंतर आजवर कोणताही परतावा न देता फिर्यादी यांची फसवणूक केली. या प्रकरणी फिर्यादी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT