कोकण

रत्नागिरी-टेम्पो-दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर

CD

rat२४p२०.jpg-
04743
शुभम पालये
------------
टेम्पो-दुचाकी अपघातात एक ठार

पानवल येथील घटना ; दुचाकी कठड्याला धडकली

रत्नागिरी, ता. २४ः रत्नागिरी ते हातखंबा रस्त्यावर पानवल फाटा येथे टेम्पो-दुचाकीच्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला. दुचाकीच्या मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्याचा प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.
शुभम सुनील पालये (वय २३, रा. कापडगांव, फणसवठार, रत्नागिरी) असे अपघातात मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २४) दुपारी पानवल फाटा येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम पालये व ऋतिक संजय कुरतडकर (वय २५, रा. कापडगाव, रत्नागिरी) हे दोघे सुट्टी झाल्यानंतर दुचाकीवरून जे. के. फाईल्स ते कापडगाव असे निघाले होते. यावेळी टेम्पो चालक सिद्धेश निलकंठ निमकर (वय २८, रा. बहादूरशेख नाका, चिपळूण) हे कुरिअर घेऊन हातखंबा ते रत्नागिरी येत होते. पानवल फाटा येथे निमकर यांचा टेम्पो रस्त्याच्या साईडपट्टीत फसला. तो बाहेर काढत असताना अचानक टेम्पोचे स्टेअरिंग वळले आणि टेम्पो दुचाकीवर जाऊन आदळला. धडक बसल्यानंतर दुचाकी कठड्याला जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीस्वार शुभम याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेला ऋतिक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. ग्रामीण पोलिसात माहिती मिळताच ग्रामीण पोलिस घटनास्थळी झाले होते. शुभम व ऋतिक एकाच कंपनीत काम करतात. शुभमचा स्वभाव अतिशय मनमिळावू होतो. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा शासकीय रुग्णालयात नातेवाईक व मित्रमंडळीने गर्दी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT