कोकण

सुविधांसाठी युद्धपातळीवर काम

CD

05341
सावंतवाडी ः येथील आठवडा बाजाराच्या जागेत युद्धपातळीवर सुरू असलेले काम.


सुविधांसाठी युद्धपातळीवर काम

सावंतवाडी आठवडा बाजार; डांबरीकरण, नाल्याची दुरुस्ती

सावंतवाडी, ता. २७ ः आठवडा बाजारासाठी येथील गोदामाकडील जागा निश्चित झाल्यानंतर त्या ठिकाणी आवश्यक सुविधा देण्यासाठी पालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. येणाऱ्या बाजारापूर्वी या सुविधा देण्याचा पालिकेचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात विजेची व्यवस्था केल्यानंतर आता डांबरीकरण आणि नाल्याची दुरुस्ती सुरू आहे. याबाबतचे आदेश शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले होते. त्यानुसार काम सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
येथील मोती तलावाच्या काठावर असलेला बाजार अखेर गोदामाच्या परिसरात असलेल्या जागेत हलविण्यात आला; मात्र या जागेत आवश्यक त्या पायाभूत सुविधा नसल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. नाल्यातील पाणी बाहेर आल्यामुळे त्या ठिकाणी चिखल होऊन भाजी खराब होण्याची शक्यता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी मंत्री केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत यावर तोडगा काढण्यात आला. यासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही केसरकर यांनी दिली होती. त्यानुसार काम सुरू करण्यात आले. बाजाराच्या जागेत शुक्रवारपासून (ता. २६) खडीकरण आणि डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. आता नाल्यात पाईप घालून पावसाचे पाणी वर येणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. विजेची व्यवस्था केली असून फिरते शौचालयही उपलब्ध करून दिले जाणार आहे. परिसरात असलेली झाडे लवकरच तोडण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT