Power Crisis
Power Crisis esakal
कोकण

Mahavitaran : थकबाकी वाढल्यामुळं भारनियमनाचं मोठं संकट; महावितरणकडून कारवाईचा बडगा, रत्नागिरीत 23 कोटी 88 लाख थकले

सकाळ डिजिटल टीम

रत्नागिरी : महावितरणची (Mahavitaran) वाढत्या थकबाकीमुळे जिल्ह्यावर भारनियमनाची टांगती तलवार निर्माण झाली आहे. मागील काही वर्षांत वसुली चांगली असल्यामुळे महावितरणच्या चार श्रेणींपैकी रत्नागिरी (Ratnagiri) जिल्हा ‘ए’ आणि ‘बी’ श्रेणीत समाविष्ट होतो. त्यामुळे भारनियमनाचे संकट नव्हते; मात्र, जिल्ह्यातील १ लाख ५ हजार ३९३ ग्राहकांची थकबाकी २३ कोटी ८८ लाखांवर गेली आहे.

वसुलीसाठी महावितरणच्या भरारी पथकाने वीजजोडणी (Power Crisis) तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. तरी वसुली झाली नाही आणि जिल्ह्याची श्रेणी घसरली, तर भारनियमनाला सामोरे जावे लागणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. ग्राहकांकडून वीजबिल भरले जात नसल्याने थकबाकीची रक्कम वाढत आहे. सर्वाधिक थकबाकी पथदीप ग्राहकांची आहे.

१ हजार ६९० स्थानिक स्वराज्य संस्थांकडे ६ कोटी ८६ लाख रुपये थकबाकी आहे. त्या पाठोपाठ ८२ हजार ३४५ घरगुती ग्राहकांकडे ६ कोटी ५० लाखांची थकबाकी आहे. वाणिज्यिक, कृषी, सार्वजनिक पाणीपुरवठा, औद्योगिक ग्राहकांकडेही कोट्यवधींची थकबाकी आहे. महावितरणकडून फिडरनिहाय भारनियमन केले जाते. ज्या फिडरवर थकबाकीचे प्रमाण अधिक, विजेची चोरी, वीजगळती या निकषांच्या आधारे भारनियमन करण्यात येते.

सध्या जिल्ह्यातही वीजचोरी, आकडा टाकण्याचे प्रकार वाढले आहेत; तसेच वीजबिल न भरण्याची मानसिकता वाढत आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्याचीही ए, बी ही श्रेणीही घसरू शकते. सी आणि डी श्रेणीत गेल्यास भारनियमन लागू होते. हे संकट जिल्ह्यावर ओढवू नये यासाठी महावितरणचे प्रयत्न सुरू आहेत.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. वसुली झाली नाही आणि आपली श्रेणी घसरल्यास भारनियमनाची टांगती तलवार आहे. म्हणून आम्ही वसुली पथके तयार करून नागरिकांना आवाहन करत आहोत. तसेच थकबाकीदारांची वीजजोडणी तोडण्याची कठोर पावले उचलली आहेत. भारनियमन टाळण्यासाठी वसुली अनिवार्य आहे.

-स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंता, रत्नागिरी

थकबाकीदार ग्राहक आणि रक्कम

  • घरगुती ग्राहक- ८२ हजार ३४५

  • थकबाकी- ६ कोटी ५० हजार

  • वाणिज्य- ८ हजार २७६

  • थकबाकी- २ कोटी ४४ लाख

  • औद्योगिक- ७९६

  • थकबाकी- १ कोटी ८ लाख

  • कृषिपंप- ८ हजार ४३२

  • थकबाकी- २ कोटी ८५ लाख

  • पथदीप- १६९०

  • थकबाकी- ६ कोटी ८६ लाख

  • पाणीपुरवठा- ११७५

  • थकबाकी- २ कोटी ५५ लाख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल...

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT