Vinayak Raut vs Eknath Shinde esakal
कोकण

उद्धव ठाकरेंनी पदाचा राजीनामा देऊन वर्षा बंगला सोडला, तेव्हा मद्यपान करून गद्दारांची औलाद..; काय म्हणाले राऊत?

राजन साळवींनी ५० खोके घेतले नाही, म्हणून त्यांच्या मागे एसीबीची कारवाई लागली.

सकाळ डिजिटल टीम

'बारसू रिफायनरी ही दलालांसाठी आणण्याचा घाट घातला जात आहे. या दलालांना ही रिफायनरी हवी आहे.'

रत्नागिरी : भाजपचे प्रमोद जठार (Pramod Jathar) यांना पक्षीय काविळ झाल्यामुळे ते बोलत आहेत. परंतु एवढा मोठा पक्ष असताना त्यांना अजून उमेदवार मिळत नाही, यातच भाजपचे अडचणीत असल्याचे दिसते. तिन तिघाड आणि काम बिघाड, अशी ही महायुती आहे. भाजपच्या (BJP) पहिल्या यादीत नितीन गडकरीसारख्या मोठ्या नेत्याचे नाव येत नाही, यावरूनच भाजपचे अपयश लक्षात येते, असा टोला शिवसेनेचे (उबाठा) उपनेते आणि खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी भाजपला हाणला.

राऊत म्हणाले, खासदार म्हणून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी मी संसदेत पाच वर्षांमध्ये शब्द काढला की नाही, हे क्युआर कोडवर क्लिक केल्यावर तुम्हाला पाहायला मिळेल. बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते, सुरेश प्रभू, ब्रिगेडीअर सावंत आदींचा आदर्श घेऊन काम करत आहे. सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडविण्याचे हे एक मोठे शस्त्र आहे.

परंतु मी गेल्या पाच वर्षांमध्ये एकही रुपयाचा रोजगार आणला नाही, असे अपयशी खासदार म्हणणाऱ्या भाजपच्या प्रमोद जठार यांना सडेतोड उत्तर दिले. राज्यात आज महविकास आघाडी भक्कम होत चालली आहे. तिन्ही पक्षांच्या मतांची गोळ बेरीज केली तर रत्नागिरी आणि रायगड लोकसभेत आम्हाला नक्की यश मिळणार हे निश्चित आहे.

शिवसेनेत फुट पडल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा देऊन वर्षा बंगला सोडला, तेव्हा मद्यपान करून टेबलवर उभे राहून नाचणारी ही गद्दारांची औलाद आहे. राजन साळवींनी ५० खोके घेतले नाही, म्हणून त्यांच्या मागे एसीबीची कारवाई लागली. परंतु तरी हा सच्चा शिवसैनिक डगमगला नाही. मला साळवींचा अभिमान आहे.

प्रदूषणकारी रिफायनरी कशाला हवी

बारसू रिफायनरी ही दलालांसाठी आणण्याचा घाट घातला जात आहे. या दलालांना ही रिफायनरी हवी आहे. परंतु लोटे औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणामुळे होणाऱ्या रोगांवर अजून उपाय नाहीत. पिढीच्या पिढी नष्ट होत आहे. त्यात ही प्रदुषणकारी रिफायनरी कशाला हवी आहे०असा प्रश्नही विनायक राऊत यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT