Fort Sumargad
Fort Sumargad esakal
कोकण

Sumargad Fort : ऐतिहासिक किल्ले सुमारगड पुरातत्त्वकडून दुर्लक्षित; शिवभक्तांसह गावकऱ्यांचे प्रयत्न

सकाळ डिजिटल टीम

सुमारगड हा विस्ताराने छोटा किल्ला असला तरी येथे गुहेतील शिवमंदिर, अनेक खांबतलाव, सुतार शाळा (School), किल्‍ल्याच्या साईटने डोंगरात कोरलेले तलाव व गुहा हे खास आकर्षण आहे.

खेड : तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले सुमारगड (Fort Sumargad) पुरातत्त्व विभागाकडून (Archaeology Department) दुर्लक्षित असून सुमारगडाच्या जतन व संवर्धन कामासाठी संयुक्तिक प्रयत्न करण्यासाठी शिवभक्तांना आवाहन करण्यात येत आहे. तालुक्यात सह्याद्री पर्वतरांगेत किल्ले रसाळगड, सुमारगड व महिपतगड हे ऐतिहासिक किल्ले शिवकालीन इतिहासाची साक्ष देत डौलाने उभे आहेत.

या तीन किल्ल्यांपैकी सुमारगड हा अति उंचावर व निसर्गरम्य परिसरात असलेला किल्ला आहे. मात्र गेली कित्येक वर्षे हा किल्ला पुरातत्त्व विभागाकडून दुर्लक्षित आहे. सुमारगड हा किल्ला अति उंचावर असल्याने व जाण्या-येण्यासाठी चांगल्या पायवाटा नसल्याने हा सुंदर किल्ला आजपर्यंत दुर्लक्षित राहिला आहे.

परंतु वाडीमालदे गावातील काही निष्ठावंत शिवभक्तांनी काही प्रमाणात सुमारगडाची साफसफाई केली आहे; तसेच काही अवघड ठिकाणी स्वखर्चाने लोखंडी शिड्यांची व्यवस्था केल्याने गडप्रेमींचे पाय सुमारगडाकडे वळू लागले आहेत. सुमारगड हा विस्ताराने छोटा किल्ला असला तरी येथे गुहेतील शिवमंदिर, अनेक खांबतलाव, सुतार शाळा (School), किल्‍ल्याच्या साईटने डोंगरात कोरलेले तलाव व गुहा हे खास आकर्षण आहे. सुमारगडावर पूर्वी मोठ्याप्रमाणात लोकवस्ती असल्याच्या पाऊलखुणा पाहण्यास मिळतात.

सुमारगड येथे जाण्यासाठी वाडीमालदे, वाडीबेळदार व रसाळगड मार्गे जाता येते. परंतु या तिन्ही वाटा घनदाट जंगलातून जात असून मागील कित्येक वर्षे या शिवकालीन पायवाटांची साफसफाई झाली नसल्याने शिवभक्तांना सुमारगडावर जाण्यासाठी फार अडचणींचा सामना करून जावे लागते.

वास्तूंची साफसफाई हवी

सुमारगडचा परिसरात वनविभागाची मालकी आहे त्यामुळे वनविभागाने पुढाकार घेऊन सुमारगडकडे जाणाऱ्या शिवकालीन पायवाटांची साफसफाई करून द्यावी. तसेच सुमारगडावर असलेल्या ऐतिहासिक वास्तूंची साफसफाई व जतन, संवर्धन पुरातत्त्व विभागाने करावे, अशी खेड तालुक्यातील सर्व शिवभक्तांची आग्रहाची मागणी आहे.

कठीण परिस्थितीचा सामना करत वाडीमालदे गावातील शिवभक्तांकडून ऐतिहासिक सुमारगडाचे जतन व संवर्धन करण्याचे सुरू असलेले कार्य महान व कौतुकास्पद असून सर्व निष्ठावंत शिवभक्तांना प्रेरणा देणारे आहे. त्यामुळे या किल्ल्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

-शिवभक्त रामचंद्र बाबू आखाडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: मुंबईतील मतदान केंद्रांवर सुविधा नाहीत; आदित्य ठाकरेंनी व्हिडिओद्वारे मांडली समस्या

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: जावेद अख्तर, शबाना आझमींनी मुंबईत केले मतदान

Deepthi Jeevanji : भारत की बेटी सब पर भारी... दीप्तीने जपानमध्ये रचला इतिहास! 400 मीटर T20 शर्यतीत जिंकले 'गोल्ड मेडल'

IPL 2024: ECB ने निर्णय बदलला... हंगाम संपण्यापूर्वीच इंग्लिश खेळाडू परत जाण्याबाबत पंजाब किंग्सच्या कोचचा खुलासा

SCROLL FOR NEXT