Railway Track esakal
कोकण

Ratnagiri Police : RTO कार्यालयाजवळील रेल्वे रुळावर शिरापासून धड वेगळं झालेल्या अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह

रिया सायंकाळी मैत्रिणीचा ओबीसीचा ऑनलाइन फाॅर्म भरण्यासाठी जाते, असे सांगून घरातून गेली होती.

सकाळ डिजिटल टीम

शोध सुरू असताना रात्री सव्वाअकराच्या सुमारास तिचा मृतदेह उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळील रेल्वे पुलाजवळील रुळावर मान व धड वेगळे झालेल्या स्थितीत आढळला.

रत्नागिरी : कुवारबाव येथील गणेशनगर-आरटीओ कार्यालयाजवळील (RTO Office) रेल्वे रुळावर (Railway Track) एका तरुणीचा मृतदेह सापडला. शिरापासून धड वेगळे झालेल्या अवस्थेत हा मृतदेह होता. ही आत्महत्या असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. चार दिवस ही मुलगी प्रचंड तणावाखाली होती, मात्र हा तणाव कसला होता, याचा पोलिस (Ratnagiri Police) तपास करत आहेत.

रिया रावसाहेब रणदिवे (वय १८, रा. रसाळवाडी-शांतिनगर, रत्नागिरी) असे मृत तरुणीचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता.१८) घडली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रिया सायंकाळी मैत्रिणीचा ओबीसीचा ऑनलाइन फाॅर्म भरण्यासाठी जाते, असे सांगून घरातून गेली होती. रात्री आठ वाजल्यानंतरही ती घरी आली नाही. म्हणून नातेवाइकांनी तिच्या मित्र-मैत्रिणींकडे शोधाशोध केली, मात्र ती सापडली नाही.

त्यानंतर रियाचे वडील रावसाहेब पोपट रणदिवे यांनी कुवारबाव पोलिस चौकीत खबर दिली. त्यानंतर रियाचे वडील व कुवारबाव पोलिस (Kuwarbav Police) चौकीतील पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष गायकवाड, श्री. तटकरी यांनी कुवारबाव परिसरात शोध सुरू केला. शोध सुरू असताना रात्री सव्वाअकराच्या सुमारास तिचा मृतदेह उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळील रेल्वे पुलाजवळील रुळावर मान व धड वेगळे झालेल्या स्थितीत आढळला.

उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांनी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी रियाच्या वडिलांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शहर पोलिस याचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT