मन आणि योग-----------लोगो
मनावरची निराशा किंवा तणाव झटकण्यासाठी आज जगातील असंख्य लोक मानसिक संघर्ष करत आहेत. मन हे अतिशय गूढ आहे. मन आपल्याला प्रत्यक्ष दिसत नाही; पण मनामध्ये येणारे अनेक विचार त्या मनाचं अस्तित्व आपल्याला सतत दाखवत असतात.
- rat२८p७.jpg-
२५O००९२६
- सानिका बाम
एमए योगा, एमए म्युझिक
---
नैराश्य ः मानसिक संघर्ष आणि उपचार
मला सुख हवंय, मला समाधानाने जगायचे आहे हे प्रत्येकाला वाटत असतं. मग सुख मिळवण्यासाठी मनाला इतका संघर्ष का करावा लागतो? मन सतत उदास, निराश का राहतं? यामधून बाहेर कसं पडायचं, हे जाणून घेऊया.
निराशा किंवा डिप्रेशनची कारणे ः आयुष्यात नको असलेल्या घटनांमुळे आपण निराश होतो. जसे की, करिअरमधील अडचणी, सततचे अपयश, नातेसंबंधांमधील संघर्ष आणि दुरावा, भांडणे, अपमान, आरोग्याच्या तक्रारी, लग्न न होणे, म्हातारपणातील एकाकीपणा, आर्थिक अशी अनेक कारणे आहेत. एखादी व्यक्ती २ ते ३ आठवड्यांपेक्षा अधिक अतिदु:खामध्ये राहिली की, ती डिप्रेशनमध्ये जाते.
लक्षणे ः एकटेपणा, भूतकाळातील आठवणींमध्ये जगणे, खूप जास्तवेळ विचार करत सुस्त पडून राहणे, स्वत:ला दोष देणे, बोलायची आणि संवादाची इच्छा संपणे, काम करण्याची इच्छा संपणे, आयुष्यात आनंद उरला नाही असे वाटणे, अंगदुखी, सतत डोके दुखणे, पोट बिघडणे, पचनाचा त्रास अशी अनेक कारणे आहेत.
निराशेतून बाहेर पडण्यासाठीचे उपाय ः योगासने-भूजंगासन, सेतूबंधासन, ताडासनसारखी आसने केल्याने शरीराचा थकवा कमी होतो. नर्व्हस सिस्टिम शांत होते. निराशेमुळे सुस्त झालेल्या शरीरातील हात, पाय, पाठीचे स्नायू मोकळे व्हायला, आळस कमी व्हायला मदत होते. थायरॉईड ग्रंथीचे संतुलन सुधारू शकते आणि तणावामुळे बिघडलेले पचन सुधारते.
दीर्घ श्वसन – नैराश्यात असलेल्या व्यक्तीने दीर्घ श्वसन केल्याने विचारांचा गोंधळ कमी होतो.
क्राय थेरपी (जपानमध्ये प्रसिद्ध असणारी आधुनिक थेरपी) ः मनात खूप दिवस दाबून ठेवलेल्या विचारांना वाट मोकळी करून देण्यासाठी भरपूर रडायचं आणि ओरडायचं, असं ही थेरपी सांगते. मुळातच दु:ख देणारी घटना घडली की, आपल्या डोळ्यातून पाणी येते ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. रडणे चांगले नाही, असे म्हटले जाते; पण क्राय थेरपीमधील रडणे हे मनातील भावना मोकळ्या करण्यासाठीचा एक मार्ग आहे आणि म्हणून तो सकारात्मक मानसिक उपचार आहे. रडल्यामुळे इंडोमोर्फिन आणि ओक्झिटोसिन या दोन हार्मोन्सची निर्मिती अधिक होते. यांना फील गूड हार्मोन्स म्हणतात. यामुळे आपला मूड चांगला, ताण कमी होतो, हलके वाटायला लागते, चांगली झोप येते. काही काळासाठी मेंदू शांत होतो, काम करण्याची स्फूर्ती मिळते आणि भावना मोकळ्या झाल्याचे समाधान मिळते. एकांतामध्ये बसायचे, झालेल्या सर्व घटना आठवायच्या किंवा अगदी एखाद्या जवळच्या किंवा परक्या व्यक्तींसोबत आपले दु:ख सांगायचे आणि मनसोक्त रडायचे.
योगासने आणि जापनीज थेरपीमुळे मन आणि शरीर यांचे को-ऑर्डिनेशन व्हायला मदत होते. मनातील भावना मोकळ्या करण्यासाठीचे हे दोन मार्ग आहेत. मन शांत होऊन वर्तमान परिस्थितीचा स्वीकार करायला मन तयार होते. मानसिक उपचार म्हणून याचा उपयोग जगात सर्वत्र होत आहे म्हणूनच निराशा झटकून मानसिक संघर्षातून बाहेर पडण्यासाठी स्वत: स्वतःची मदत करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.