कोकण

अभ्यासक्रमात व्यवहारज्ञान आवश्यक

CD

03350

अभ्यासक्रमात व्यवहारज्ञान आवश्यक

डॉ. प्रसाद देवधर ः जामसंडेत बहुविध कौशल्य अभ्यासक्रमाचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ९ ः शिक्षणातून केवळ मेंदूला काम मिळते. मात्र, हाताला काम हवे असल्यास कौशल्य विकास महत्त्वाचा ठरतो. शैक्षणिक गुणवत्तेमध्ये मागे असणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याकडे कौशल्य विकासाची पुंजी असल्यास त्याला जगणे सोपे जाते. आज शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थी जे शिकतो ते व्यवहारात नाही आणि व्यवहारात आहे ते शिकवले जात नाही, अशी अवस्था असल्याचे परखड मत झाराप येथील भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. प्रसाद देवधर यांनी जामसंडे येथे व्यक्त केले. समाजाने आयुष्याकडे डोळसपणे बघण्याची दृष्टी ठेवली पाहिजे, असेही ते म्हणाले.
चालू शैक्षणिक वर्षापासून जामसंडे येथील श्री. मो. गोगटे माध्यमिक विद्यामंदिरमध्ये आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे येथील ‘कॉज टू कनेक्ट फाउंडेशन’ या संस्थेमार्फत बहुविध कौशल्य अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असून या कार्यशाळेच्या उद्‍घाटनप्रसंगी डॉ. देवधर बोलत होते. त्यांनी सध्याची शिक्षण पद्धती आणि समाजातील त्याची उपयोगिता या अनुषंगाने परखड मत मांडले. शिक्षणासह विद्यार्थ्यांकडे कौशल्य विकासाची पुंजी आवश्यक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
व्यासपीठावर कॉज टू कनेक्ट फाउंडेशन संस्थेचे संस्थापक व संचालक अनिरुद्ध बनसोड, संस्थाध्यक्ष अ‍ॅड. अजित गोगटे, कार्यवाह प्रवीण जोग, सदानंद पवार, प्रकाश गोगटे, रघुनाथ काळे, माजी कार्यवाह संतोष कुळकर्णी, दिलीपकुमार फडके, मुख्याध्यापक सुनील जाधव आदी उपस्थित होते.
डॉ. देवधर म्हणाले, ‘विश्वगुरू होण्यासाठी ‘शास्त्री’पेक्षा ‘मेस्त्री’ हवेत. अर्थात केवळ ज्ञान असणे पुरेसे नाही, तर त्यामध्ये कौशल्य हवे. शिक्षणातून केवळ मेंदूला काम मिळते. मात्र, हाताला काम हवे असल्यास कौशल्य विकास महत्त्वाचा आहे. शालेयदशेत एखादा नापास विद्यार्थी कौशल्य विकासाच्या बळावर समाजात, व्यवसायात यशस्वी झाल्याची उदाहरणे आहेत. यासाठी आयुष्याकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी हवी. ज्यांच्याकडे तत्वाचे धागेदोरे असतात, तेव्हाच महात्मे घडतात. समाजातील छोट्या घटकांकडे कला असते. ही मंडळी शिक्षणामध्ये आल्यास बेरोजगार होतील. मात्र, कौशल्य विकास असल्यास यशस्वी ठरतील.’
श्री. बनसोड यांनी, या उपक्रमाला पालकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. यासाठी त्यांनी मुलांना प्रोत्साहित केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन शिकल्यास त्याचा अधिक लाभ होईल, असे सांगितले. अ‍ॅड. गोगटे यांनी, नवे काहीतरी करताना सकारात्मक राहायला हवे, असे सांगितले. प्रकाश गोगटे, दिलीपकुमार फडके आदींनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक श्री. जाधव यांनी उपक्रमाची आवश्यकता स्पष्ट केली. प्रज्ञा कांबळी यांनी सूत्रसंचालन केले. संजय पांचाळ यांनी आभार मानले.
.........................
स्वविकसन प्रक्रिया जीवनात महत्त्वाची
विज्ञान म्हणजे अशक्यतेतून शक्यतेचा प्रवास आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा पदर पकडून पुढे जाण्याची आवश्यकता आहे. कमीत कमी संसाधने वापरून अधिकाधिक प्रकाश मिळवणे, हे कौशल्य. यासाठी माहितीचे रुपांतर ज्ञानात झाले पाहिजे. आज परदेशाच्या तुलनेत आपल्या देशात शिक्षण आणि आरोग्यासाठी कमी खर्च होतो. निसर्गाकडून बुद्धिमत्ता शिकण्यासारखी असते. जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वविकसनाची प्रक्रिया महत्त्वाची ठरते, असेही डॉ. देवधर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: डोंबिवलीत राजकीय पलटवार! भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांचा शिंदे गटात प्रवेश

Julie Yadav: घरी विसरलेला मोबाईल परत आणायला गेली अन्...; भारतीय महिला हॉकी खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू, घटनेनं हळहळ

Organ Donation : अवयवदानासाठी राज्यांनी पुढाकार घ्यावा; रस्ते अपघातांतील मृतांबाबत केंद्र सरकारचे निर्देश देशात, अवयवदानाचे प्रमाण दहा लाखांमागे एक!

फी न दिल्यानं परीक्षेला बसू दिलं नाही, विद्यार्थ्यानं पेटवून घेतलं; प्राचार्य म्हणाले, २५ हजाराचा फोन अन् १ लाखाची गाडी वापरतो

Gujarat Ats : गुजरात एटीएसची मोठी कारवाई: 'रायसिन' विष तयार करणाऱ्या डॉक्टरसह तीन जण अटकेत!

SCROLL FOR NEXT