कोकण

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अथर्व तेंडुलकर प्रथम

CD

- rat२७p१.jpg -
२५O०६९४४
लांजा ः विजयी स्पर्धकांचा गौरव करताना आनंदा कांबळे. सोबत डावीकडून डॉ. रोहिनील जाधव, सुधाकर कांबळे, विश्वजित कांबळे, इम्तियाज सिद्दिकी, प्रदीप पवार, मधुरा कांबळे, किशोर कांबळे आदी.
---
वक्तृत्व स्पर्धेत अथर्व तेंडुलकर प्रथम
संविधान दिनानिमित्त आयोजन; सानिका यादव द्वितीय
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २७ ः लांजा तालुका जयंती महोत्सवाच्यावतीने २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अथर्व तेंडुलकर याने प्रथम तर सानिका यादव हिने द्वितीय क्रमांक पटकावला तसेच तृतीय क्रमांक सोनाली कदम हिला मिळाला.
संविधान दिनानिमित्ताने व सामाजिक कार्यकर्ते दिवंगत राजेंद्र आयरे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ काल (ता. २६) आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धा या शहरातील कुलकर्णी-काळे छात्रालय येथे पार पडल्या. या स्पर्धेच्या उद्‍घाटनप्रसंगी आनंदा कांबळे (माजळकर), सुधाकर कांबळे, लांजा तालुका जयंती महोत्सव कमिटीचे अध्यक्ष डॉ. रोहिनील जाधव, विश्वजित कांबळे, उज्वल पवार, प्रदीप पवार, किशोर कांबळे, प्राजक्ता जावडेकर, मधुरा कांबळे, अनिल कासारे उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण इम्तियाज सिद्दिकी यांनी केले. स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण १३ स्पर्धकांची निवड केली होती. त्यामध्ये उत्तेजनार्थ सेजल तांबे, विदुला रामकृष्ण कुलकर्णी, मुजीबा लांबे यांनी पटकावला. विजयी स्पर्धकांना अनुक्रमे सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Income Tax Reform : उत्पन्न लपविणाऱ्यांना आणि विदेशात संपत्ती असणाऱ्यांना आता तुरुंगवास नाही! काय आहे नवीन नियम?

Devendra Fadnavis: ''..तर अजितदादांनी आम्हांला तसं सांगितलं असतं'', दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

Solapur News: रखडलेल्या बसवेश्वर पुतळ्यासाठी २४ संघटना एकवटल्या; भरघोस निधी असतानाही प्रत्यक्ष काम न झाल्याने कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह!

MSME Budget 2026: निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पातून ट्रम्प यांना खणखणीत उत्तर; एमएसएमईच्या बळकटीकरणामुळे युरोपीय बाजारपेठेत भारताचा दबदबा!

Pune Dirty City Controversy : पुणे घाणेरडे शहर, बिल गेट्सच्या माजी सल्लागाराने व्यक्त केलेला तिरस्कार, एपस्टीन फाइल्समध्ये धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT