कोकण

खल्वायनची मासिक संगीत सभा शनिवारी

CD

खल्वायनची उद्या संगीत सभा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ ः येथील खल्वायन-रत्नागिरी या संस्थेची ३२०वी मासिक संगीतसभा शनिवारी (ता. १३) सायंकाळी ६ ते ८ या वेळात नेहमीप्रमाणेच रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकासमोरील सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात आयोजित केली आहे. कै. विमलाबाई लेले आणि कै. द्वारकानाथ बाळ स्मृती मासिक संगीतसभा पुण्याच्या उदयोन्मुख युवा गायिका सावनी शिखरे यांच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच अभंग-नाट्यगीत गायनाने रंगणार आहे.
सावनी यांचे शास्त्रीय गायनाचे शिक्षण वयाच्या १०व्या वर्षापासून विदुषी मंजुषा पाटील यांच्याकडे सुरू झाले. त्यानंतर २०१७ पासून समीहन कशाळकर आणि पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर यांच्याकडून तिने मार्गदर्शन घेतले. पुणे भारती विद्यापीठ येथून तिने एमए (म्युझिक) ही पदवी प्राप्त केली आहे. एमआयटी विश्वशांती गुरूकुलची त्यांना शिष्यवृत्ती मिळालेली आहे. या मैफलीला रत्नागिरीचे प्रसिद्ध तबलावादक प्रथमेश शहाणे व हार्मोनिअम पुणे येथील प्रसिद्ध वादक अथर्व कुलकर्णी (तन्मय देवचके यांचे शिष्य) साथसंगत करणार आहेत. ही मैफल विनाशुल्क असून, सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थाध्यक्ष मनोहर जोशी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बलाढ्य भाजपलाही दगाफटक्याची भीती; 'शिट्टीच्या' धसक्याने तब्बल 43 नगरसेवक अज्ञातस्थळी

DMart नव्हे, आता 'She Mart'! महिलांसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा; नेमकी योजना काय?

Pune Porsche Accident : मोठी बातमी ! सुप्रीम कोर्टाकडून पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील ३ आरोपींना जामीन मंजूर, कोर्टाची महत्वाची टिप्पणी

Horoscope Prediction 2026: नशीब बदलणार! 3 फेब्रुवारीला बुध कुंभ राशीत, कन्यासह ‘या’ 5 राशींचा गोल्डन टाईम सुरु

Latest Marathi News Live Update : पुणे महानगरपालिकेत अजितदादांचा पुतळा उभारा, शिंदे सेनेची मागणी

SCROLL FOR NEXT