कोकण

सावंतवाडीत आयुष केंद्र प्रस्तावित; जिल्ह्याला दिलासा

CD

10208
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान.
10209
धारगळ (गोवा) ः येथे पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. पी. के. प्रजापती व डॉ. सुजाता कदम.


सावंतवाडीत आयुष केंद्र प्रस्तावित; जिल्ह्याला दिलासा

दिल्लीत वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव; रुग्णांना मिळणार मोफत उपचार

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १२ ः धारगळ-गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या सेवांचा लाभ मोठ्या प्रमाणात घेणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना आता जिल्ह्यातच उपचार सुविधा उपलब्ध करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात संस्थेचे केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव दिल्ली येथील वरिष्ठ कार्यालयाला पाठविला असून, लवकरच यावर सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याची माहिती अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानाचे संचालक प्रा. (वैद्य) पी. के. प्रजापती यांनी ‘सकाळ’ला दिली. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना सर्व प्रकारचे आयुर्वेदिक उपचार मोफत मिळणार आहेत.

धारगळ येथील आयुर्वेद संस्थानला आज तीन वर्षे पूर्ण झालीत. यावेळी येथील आयुर्वेदिक उपचार पद्धती, आयुर्वेद उपचाराबाबत करण्यात येणारी जागृती, लोकांनी मोठ्या प्रमाणात स्वीकारलेली उपचार पद्धती याबाबत ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी आयुर्वेद संस्थानच्या अधिष्ठाता प्रा. डॉ. सुजाता कदम, डॉ. विनायक चकोर उपस्थित होते.

प्रा. प्रजापती म्हणाले, ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण धारगळ येथे उपचारासाठी येतात. त्यामुळे त्यांना जिल्ह्यातच उपचार मिळावेत या हेतूने सावंतवाडीत केंद्र सुरू करण्याची इच्छा असून, त्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. प्रस्ताव संमत झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाशी करार करून केंद्र तातडीने सुरू केले जाईल. तोपर्यंत धारगळ येथे येणाऱ्या सिंधुदुर्गातील रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरते सहाय्यता केंद्र सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे.’

ते म्हणाले, ‘मागील तीन वर्षांपासून सिंधुदुर्ग व गोव्यातील रुग्णांसाठी अत्याधुनिक आयुर्वेद उपचार उपलब्ध करून देत आहे. दिवसाला १००० हून अधिक रुग्ण ओपीडीमध्ये सेवा घेत आहेत. वाढती मागणी लक्षात घेऊन २५० खाटांची आयपीडी वाढ, अत्याधुनिक यंत्रसामग्रीची खरेदी, केंद्राच्या विस्तारासाठी गोवा शासनाकडे अतिरिक्त जागेची मागणी तसेच पाच मॉड्युलर ऑपरेशन थिएटर सुरू होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. जागेची उपलब्धता झाल्यास अधिक प्रमाणात रुग्णांना सेवा देण्यात येणार आहे. तसेच अनेक महत्वाच्या सुविधा वाढविण्यात येतील.’
दिल्ली येथे पार पडत असलेल्या दुसऱ्या जागतिक आरोग्य संघटना ग्लोबल समिट ऑन ट्रॅडिशनल मेडिसिनमध्ये अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा सक्रिय सहभाग घेत आहे. या परिषदेत सुरक्षिततेच्या मूल्यमापनावर भर असून, उच्च-गुणवत्तेची, पुराव्यानिर्मित अश्वगंधा उत्पादने जागतिक पातळीवर स्वीकारली जाण्यास मदत होणार असल्याचे प्रा. प्रजापती म्हणाले.
प्रा. (डॉ.) सुजाता कदम यांनी सांगितले की, ‘स्थापना दिनानिमित्त हेल्थ असेसमेंट स्क्रिनिंग ओपीडी, डेंटल ओपीडी, तसेच कायचिकित्सा आणि कौमारभृत्य पंचकर्म थिएटर आणि आयपीडी विस्तार सुरू केले आहे. सध्या रोज ९०० हून अधिक रुग्ण ओपीडीचा लाभ घेतात, सर्वांना विनामूल्य आयुर्वेदिक औषधे पुरविण्यात येतात. स्थापनेपासून आजपर्यंत ५.२५ लाख रुग्णांनी ओपीडीचा लाभ घेतला आहे. ३१,००० हून अधिक आंतररुग्ण आयपीडी, ७७,२०० रुग्णांनी पंचकर्म, १.३५ लाख रुग्णांनी रेडिओलॉजी व लॅब चाचण्या यांचा लाभ घेतला आहे. पंचकर्म हे आयुर्वेदचे मुळ असल्याने रुग्णालयात पंचकर्मची स्वतंत्र ओपीडी सुरू केली आहे. त्यासोबतच दंतचिकित्सा ओपीडीही सुरू केली आहे. टाटा कॅन्सर हॉस्पिटल सोबत करार केला असून लवकरच याठिकाणी कर्करोगावरही आयुर्वेदिक चिकित्सा सुरू करण्यात येणार आहे.
------------
मिळणाऱ्या सुविधा
आयुर्वेद संस्थानने रुग्णालये आणि आरोग्यसेवा पुरवठादारांसाठी राष्ट्रीय मान्यता मंडळ असलेल्या नॅशनल अ‍ॅक्रेडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (NABH) ची मान्यता मिळवत गुणवत्तापूर्ण आणि सुरक्षित आरोग्यसेवेत योगदान सिद्ध केले आहे. सध्या संस्थेत २५ विशेष ओपीडी कार्यरत आहेत, ज्यात मानसिक रोग चिकित्सा, व्यसनमुक्ती, स्वस्थ रक्षण, डायबेटिस, कॅज्युअल्टी व क्रिटिकल केअर, बहुविशिष्ट तज्ज्ञ सेवा, पंचकर्म विभाग या महत्वाच्या सुविधा उपलब्ध आहेत.
------------
सिंधुदुर्गासाठी महत्त्वाचा टप्पा
आयुर्वेद संस्थान गोवा मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल, वेलनेस टुरिझम, संशोधन आणि शिक्षणाच्या क्षेत्रात आघाडीवर आहे. संस्थेने गोवा पर्यटन विभाग, CSIR-NIO, बिट्स पिलानी, गोवा राज्य जैवविविधता मंडळ, GIM आणि टाटा मेमोरियल ACTREC यांच्यासह महत्त्वपूर्ण करार केले आहेत. संस्थांनच्या विस्ताराचा थेट फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो रुग्णांना होणार आहे. धारगळपर्यंतचा प्रवास टाळून सावंतवाडीमध्येच अत्याधुनिक आयुर्वेद उपचार मिळणार, ही सिंधुदुर्गकरांसाठी अत्यंत मोठी, सकारात्मक पायरी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'अरे ९० वर आहे, आऊट होईल...'! खेळाडूने स्लेजिंग केली, Vaibhav Suryavanshi चा 'Cute' रिप्लाय; मोडला गिल, AB चा विक्रम...

Pune News : दौंडमध्ये SRPF च्या ७१ व्या दीक्षांत संचलनात ३१६ नवप्रविष्ठांना कर्तव्यशपथ; आधुनिक युद्धतंत्राची तयारी सुरू!

Latest Marathi News Live Update : शनैश्वर देवस्थानचा कारभार विश्वस्तांनीच पहावा, उच्च न्यायालयाचा आदेश

Google Search : रात्रीच्या वेळी मुली गुगलवर सर्वांत जास्त काय सर्च करतात? 2025 च्या धक्कादायक डेटामुळे जग हादरलं

Manchar News : मंचरमध्ये हुतात्मा बाबू गेनू प्राण ज्योतीचे जल्लोषात स्वागत; घोषणांनी दुमदुमला छत्रपती शिवाजी महाराज चौक!

SCROLL FOR NEXT