कोकण

नांदगाव व्यापारी संघटनेचा वर्धापन उत्साहात साजरा

CD

swt294.jpg
20662
नांदगाव ः श्रुती म्हसकर हिने आपल्या सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली.

नांदगाव व्यापारी संघटनेचा
वर्धापन उत्साहात साजरा
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २९ : येथील व्यापारी संघटनेचा वर्धापनदिन विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांना ग्रामस्थ व भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
सकाळी श्री सत्यनारायण महापूजा व दुपारी महाआरती पार पडली. त्यानंतर तीर्थप्रसाद व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून असंख्य भाविकांनी त्याचा लाभ घेतला. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला. त्यानंतर खेळ पैठणीचा कार्यक्रम घेण्यात आला. याचे सूत्रसंचालन ऋषिकेश मोरजकर यांनी केले. सायंकाळी गणेश सेवा मंडळ, नांदगाव वाघाचीवाडी यांच्या पारंपरिक भजनाने परिसर भक्तिमय झाला.
ओम प्रासादिक भजन मंडळ, नांदगाव वाघाचीवाडी तसेच युवा भजनी बुवा श्रुती म्हसकर हिने अभंग, गजर व गौवळणी सादर करत आपल्या सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली. रात्री दहा नंतर जय हनुमान पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, दांडेली आरोस यांचा ‘शिवमंगळा गौरी’ हा महापौराणिक नाट्यप्रयोग सादर झाला. यामध्ये स्त्री पात्राची भूमिका साकारलेले कलाकार नितीन घाडीगावकर यांच्या मनमोहक अदाकारीला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. नाट्यप्रयोगाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास उपस्थित सर्व भाविकांचे अध्यक्ष सुरेंद्र ऊर्फ पप्पी वायंगणकर, उपाध्यक्ष गोपाळ मोरये, खजिनदार दिलीप फोंडके, सचिव ऋषिकेश मोरजकर तसेच सर्व व्यापारी बांधवांनी आभार मानले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नांदगाव व्यापारी संघटनेच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

Railway recruitment: रेल्वेमध्ये तब्बल २० हजारांहून अधिक 'ग्रुप डी' पदांसाठी भरती सुरू ; इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

Rohit Shetty House Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारप्रकरणी पुण्यातून पाचजण ताब्यात, गॅंगस्टर बिश्नोई टोळीशी संबंधाचा संशय

SCROLL FOR NEXT