कोकण

कोकण स्टार्टअपमध्ये १० संघांचे सादरीकरण

CD

स्टार्टअप चॅलेंजमध्ये पाच संघ अव्वल
माने महाविद्यालयात अंतिम फेरी; १० संघाचे सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा​
संगमेश्वर, ता. ३० ः प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या ‘नवप्रबोधन रिसर्च अँड इनक्युबेशन फाउंडेशन’द्वारे राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, आंबव येथे आयोजित कोकण स्टार्टअप् चॅलेंज २०२६चा अंतिम सोहळा उत्साहात झाला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या ३०पैकी १० स्टार्टअप्सनी आपली सादरीकरणे तज्ज्ञांसमोर सादर केले. त्यामधून पाच सर्वोत्कृष्ट स्टार्टअप्सची निवड करण्यात आली आहे.
आंबव येथे हा कार्यक्रम झाला असून, प्रसिद्ध उद्योजक दीपक गद्रे यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. या वेळी प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र माने, कार्यकारी अध्यक्षा नेहा माने, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रद्युम्न माने, ईशानी वाघ-माने, आरएमसीईटी कॉलेजचे प्राचार्य डॉ. महेश भागवत आणि इंदिरा फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमोल खाडे उपस्थित होते. गद्रे यांनी देवरूखशी असलेल्या आपल्या जुन्या ऋणानुबंधांना उजाळा दिला. एनआरआयएफच्या या उपक्रमाचे कौतुक करताना त्यांनी स्टार्टअप्सना प्रत्यक्ष व्यवसायात रूपांतरित होण्यासाठी प्रोत्साहन दिले तसेच प्रद्युम्न माने यांनी कोकणातील तरुणपिढीच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देण्याचा संस्थेचा मानस व्यक्त केला. ईशानी माने यांनी एनआरआयएफच्या माध्यमातून स्टार्टअप्सना मिळणाऱ्या संधींची माहिती दिली.
या स्पर्धेत भोपाळ, मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी, चिपळूण आणि लातूर येथील संघांनी सहभाग नोंदवला होता. कृषी, तांत्रिक आणि औषधनिर्माण अशा विविध क्षेत्रांतील कल्पक सादरीकरणे या वेळी करण्यात आली. तज्ज्ञ परीक्षक अनुराग कोकीटकर (ब्रँड स्पेशालिस्ट) यांनी ब्रँड क्रिएशनवर तर विशाल नरवेकर जीआय टॅगिंगवर मार्गदर्शन केले.
--------
चौकट
पाच उदयोन्मुख स्टार्टअप्सचा गौरव
या कार्यक्रमात पाच उदयोन्मुख स्टार्टअप्सना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. त्यात अपेक्षा रहाटे आणि संघ, सुकन्या पाटील आणि संघ, मानसी पाटील आणि संघ, प्रणाली दळवी आणि संघ, डॉ. शिल्पा केवाटे आणि संघ निवड झालेल्या या स्टार्टअप्सना एनआरआयएफ इनक्युबेशन सेंटरद्वारे नोंदणी आणि पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी तांत्रिक सहकार्य दिले जाईल, असे डॉ. अमोल खाडे यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

WPL 2026: Mumbai Indians चे आव्हान संपले! दिल्ली कॅपिटल्सच्या युपीवरील विजयाने प्लेऑफचं चित्र स्पष्ट

Railway recruitment: रेल्वेमध्ये तब्बल २० हजारांहून अधिक 'ग्रुप डी' पदांसाठी भरती सुरू ; इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

SCROLL FOR NEXT