‘सैनिक कल्याण’चे
खेड, चिपळूण येथे दौरे
रत्नागिरी ः माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरनारी, वीरमाता, वीरपिता यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत खेड आणि चिपळूण येथे कल्याण संघटक यांचे फेब्रुवारी २०२६ मध्ये दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. २ फेब्रुवारीला खेड येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह आणि ३ला चिपळूण येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे कल्याण संघटक राहुल काटे हे उपस्थित राहणार आहेत. ९ ला खेड सैनिकी मुलांचे वसतिगृह आणि १०ला चिपळूण सैनिकी मुलांचे वसतिगृह तसेच ११ला मंडणगड येथील भोसले प्लाझा येथे सुनील कदम यांचा दौरा असेल. १६ला खेड आणि १७ला चिपळूण येथे कल्याण संघटक अनिल मोरबाळे हे दौरा करणार आहेत. २३ ला खेड आणि २४ला चिपळूण येथे सुनील कदम दौऱ्यावर असतील. या दौऱ्यामध्ये अभिलेख कार्यालयविषयक, पेन्शनविषयक, महासैनिक पोर्टलवर रजिस्ट्रेशन (नोंदणी) तसेच इतर अडचणी सोडवण्यात येतील.
डॉ. राजकुमार पवार
यांना पीएच.डी.
खेड ः तालुक्यातील लवेल येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी माहिती तंत्रज्ञान विभागातील प्रा. डॉ. राजकुमार पवार यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली. वांद्रे-मुंबई येथील थडोमल शाहाणी अभियांत्रिकी महाविद्यालयातून महाविद्यालयातील संशोधन केंद्रातून ‘डीप लर्निंग’ तंत्रज्ञानाच्या साह्याने भारतीय कृषी संशोधन वृद्धिंगत करणे या विषयावर संशोधन केले. ते १६ वर्षांपासून महाविद्यालयात माहिती तंत्रज्ञान संगणक विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. चार संशोधन निबंध व एक नोंदणीकृत पेटंट त्यांच्या नावे आहे.
आंतरमहाविद्यालयीन
‘आयसीएस’मध्ये स्पर्धा
खेड ः आयसीएस महाविद्यालयातील आयक्युएसी ग्रीन क्लब व भूगोल वाणिज्य विभागातर्फे घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्राचार्या डॉ. अनिता आवटी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या स्पर्धेत ४५ विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये कला व ज्ञान सादर केले. चिपळूणच्या डीबीजे महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद तर रत्नागिरीच्या डीजीके महाविद्यालयाला उपविजेतेपदाचा चषक मिळाला. या प्रसंगी समन्वयक प्रा. डॉ. आयुब शेख, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. सी. आर. साळुंखे, प्राणी शास्त्र विभागाचे डॉ. आर. एस. भालेराव आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.