कोकण

जमीन विक्रीसाठी दबावतंत्र थांबवा

CD

जमीन विक्रीसाठी दबावतंत्र थांबवा

गणेशप्रसाद गवस ः दोडामार्ग ‘महसूल’ला जनआंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ३० ः ‘अधिकाराचा गैरवापर करून जमीन विक्रीसाठी स्थानिकांवर दबाव आणण्याचे धंदे दोडामार्ग महसूल विभागाने आता बंद करावे. या आधी आरोप झालेल्या तालुक्यातील विविध कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणांत या विभागाने आधीच लोकांचा विश्वास गमावला आहे. दिल्ली लॉबीच्या तालावर नाचून स्थानिकांच्या जमिनी परप्रांतीयांच्या घशात घालण्यासाठी साथ देण्याचे उद्योग सुरूच राहिल्यास जनआंदोलन उभारावे लागेल,’ असा इशारा शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी आज पत्रकातून दिला.
पत्रकात नमूद केले आहे, की कोलझर येथे परप्रांतीयांनी जमीन खरेदी करून स्थानिक जमीन मालकांच्या क्षेत्रात अतिक्रमण करत त्यात उत्खनन केले. या विरोधात तेथील स्थानिक एकवटले. त्यांनी दिल्ली लॉबीला शिरकाव करू देणार नाही आणि आपल्या वडिलोपार्जित जमिनी जपणार, असा निर्धार केला. अशा स्तुत्य गोष्टीला प्रशासनाची साथ मिळणे आवश्यक होते. भूमिपुत्रांच्या जमिनीचे कायदेशीर संरक्षण करण्याची जबाबदारी महसूल विभागाची आहे. लोकांचा या यंत्रणेवर अनेक वर्षे विश्वास आहे. हा विश्वास विविध कायदे आणि राज्यघटनेने दिला आहे. असे असूनही दोडामार्ग तहसील कार्यालयाने ज्यांच्या जमिनीत बेकायदा अतिक्रमण झाले, त्यांनाच उलट ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावल्या आहेत. स्थानिकांवर दबाव आणून जमिनी दिल्ली लॉबीच्या घशात घालण्यासाठी हे तंत्र वापरले जात नाही ना, अशी शंका घ्यायला वाव निर्माण झाला आहे. कारण याआधी दोडामार्ग ‘महसूल’च्या कारभारावर स्थानिक भूमिपुत्रांनी केलेले आरोप गंभीर आहेत.
पत्रकात नमूद आहे, की अलीकडेच सासोली येथील जमीन गैरव्यवहार गाजला. तेथील स्थानिकांचा मुख्य आरोप दोडामार्ग महसूल विभागावर आहे. ते ग्रामस्थ या विरोधात दीर्घकाळ लढा देत आहेत. कोलझर येथे दिलेल्या नोटिसा पाहता या सगळ्या प्रकारामध्ये गौडबंगाल असल्याचा संशय बळावत आहे. दोडामार्ग महसूल विभागाने या आधीच लोकांचा विश्वास गमावला आहे. तो परत मिळवण्यासाठी त्यांनी स्थानिकांच्या मालमत्ता, जमिनी यांचे संरक्षण करण्याची आणि त्यांना साथ देण्याची भूमिका घ्यायला हवी.
दरम्यान, कोलझर जमीन नोटीस प्रकरणी दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव यांनी याआधीच संबंधित प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत राहून केल्याचे सांगितले आहे.
----
...अन्यथा ‘महसूल’विरोधात जनआंदोलन!
तालुक्यातील स्थानिकांच्या अनेक पिढ्या वडिलोपार्जित जमिनीवर शेती बागायती करून समृद्ध आयुष्य जगत आले आहेत. त्यांच्यावर असले दबाव टाकून सोन्यासारख्या या जमिनी परप्रांतीय धनिकांच्या घशात घालण्याचा प्रयत्न झाल्यास यापुढे तो सहन केला जाणार नाही. या विरोधात कायदेशीर मार्गाने लढा दिला जाईलच; पण त्याबरोबरच दोडामार्ग महसूल विभागाविरोधात जनआंदोलन उभारण्यात येईल. त्यामुळे या विभागाने लोकहिताविरोधातील धंदे आताच थांबवावेत, असा इशारा त्यांनी या पत्रकातून दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात नवीन शासकीय विश्रामगृह; लष्कर परिसरात ४८ कक्षांची इमारत, ३३ कोटींचा खर्च, ४८ कक्ष उपलब्ध राहणार!

Nashik Municipal Corporation : नाशिकच्या महापौरपदासाठी भाजपचा 'सव्वा वर्षाचा फॉर्म्युला'! अडीच वर्षांत दोन महिलांना मिळणार संधी?

Union Budget 2026: मोठी बातमी! 15,000 शाळा व 500 कॉलेजमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब्स, गेमिंगमध्ये 10 लाख नोकऱ्यांचा मार्ग मोकळा

Nashik News : नाशिकच्या उद्योग जगतात सत्तांतर! 'आयमा'च्या अध्यक्षपदी राजेंद्र पानसरे यांचा दणदणीत विजय

मुंबई ओपन टेनिस: अंकिता रैनाची विजयी सलामी; आकांक्षा नित्तुरेवर मिळवला दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT