कोकण

अजितदादांमुळे स्थानिक विकासात मदत

CD

20886


अजितदादांमुळे स्थानिक विकासात मदत

नंदकुमार घाटे ः देवगड येथे अजित पवार यांना श्रद्धांजली

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३० ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक विकासात्मक प्रश्‍न सोडवले आहेत. वैयक्तिक पातळीवरही जनमानसाची कामे त्यांनी केली. त्यांच्यामुळे स्थानिक विकासामध्ये मदत झाली. असा राजकीय नेता पुन्हा होणे नाही, असे मत राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी आज येथे श्रद्धांजली कार्यक्रमात व्यक्त केले. जनतेशी प्रामाणिक असलेला राजकीय नेता होता असेही त्यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल त्यांना येथील पक्ष कार्यालयात आदरांजली वाहिली. यावेळी श्री. घाटे बोलत होते. यावेळी श्री. घाटे यांच्यासह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव, मोंड उपसरपंच अभय बापट, शरद शिंदे, दिवाकर परब, तात्या वाळके, नीलेश पेडणेकर, श्यामकांत शेटगे, शिवप्रसाद पेडणेकर, जयराम कदम, सुहास नाणेरकर, ज्ञानदेव भडसाळे, पूनम मुणगेकर, बंटी कदम, विलास रूमडे, विजय जगताप, सुरेश सोनटक्के, सुधीर मांजरेकर यांच्यासह अन्य उपस्थित होते. श्री. घाटे यांनी, तत्कालीन राज्य सरकारमध्ये अजित पवार जलसंपदामंत्री असताना येथील नळपाणी योजनेच्या दहिबांव येथील उद्भवाजवळील अन्नपूर्णा नदीतील गाळ काढण्यासाठी त्यांची मदत झाली होती. त्यांना सांगितल्यावर कोणत्याही विकास कामाबाबत तातडीने कार्यवाही होत होती. नागरिकांची वैयक्तिक पातळीवरही त्यांनी कामे केली होती. सर्वसामान्यांचे प्रश्‍न जाणून घेऊन त्याची तातडीने सोडवणूक करणे यामध्ये त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे जनमानसात रुजलेले नेतृत्व अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याचे दुःख असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी स्थानिक विकासाचा धावता आढावा त्यांनी घेतला. श्री. सोनटक्के यांनी अजित दादांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांची शिस्त, बारीक निरीक्षण आणि त्यांच्या कामाची पद्धत याअनुषंगाने आठवणींना उजाळा दिला. यावेळी प्रदीप मुणगेकर, दयानंद मांगले, विलास रूमडे यांनी मनोगत व्यक्त केले.
...................
हक्काचा माणूस गेला ः बापट
कोणत्याही विकासकामांबाबत तातडीने निर्णय घेण्यात अजित पवार यांचा हातखंडा होता. ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते कोणतेही काम घेऊन गेल्यावर त्यांचा होणारा सन्मान हीच त्यांच्या कार्याची पोचपावती होती. एक हक्काचा माणूस निघून गेल्याने देवगड तालुक्याचे फार मोठे नुकसान झाल्याचे अभय बापट यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Union Budget 2026 Live : मंदिरांसाठी ५ हजार कोटींची तरतूद, अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा

Union Budget 2026 : अर्थसंकल्पात पुण्यासाठी मोठं गिफ्ट ! मुंबई- पुणे हायस्पीड ट्रेन कॉरिडॉरची घोषणा, दोन्ही शहरांतील अंतर होणार आणखी कमी

Stock Market Updates : बजेटसुरू होताच शेअर बाजार उसळला! सरकारचा 7 धोरणात्मक क्षेत्रांवर भर, कोणते सेक्टर तेजीत?

Union Budget 2026 : भारतात सुरू होणार सेमी कंडक्टर मिशन; यंदा 40 हजार कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद, तंत्रज्ञान क्षेत्रावर जास्त भर

Union Budget 2026 : खादी, हातमाग व हस्तकला क्षेत्राला अर्थसंकल्पातून मिळणार नवे बळ; निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT