कोकण

कथाकथनात श्रेया, जान्हवी प्रथम

CD

21046

कथाकथनात श्रेया, जान्हवी प्रथम

जिल्हास्तरीय स्पर्धा; मळगाव वाचनालयाचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३१ ः मळगाव येथील (कै.) प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरातर्फे प्रा. रमेश कासकर स्मृती जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेच्या लहान गटात आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल, आरोसच्या श्रेया खोत हिने तर मोठ्या गटात राणी पार्वती देवी हायस्कूल, सावंतवाडीच्या जान्हवी पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील इतर विजेते असे ः ​पाचवी ते सातवी लहान गट-द्वितीय पार्थ सावंत (राणी पार्वती देवी हायस्कूल, सावंतवाडी), तृतीय हर्षदा जोशी (गजानन विद्यालय, पाट), उत्तेजनार्थ पूर्वा मुळीक (विद्या विकास हायस्कूल, आरोस), प्रांजल तेरसे (कुडाळ हायस्कूल). आठवी ते दहावी मोठा गट-द्वितीय करिश्मा मांजरेकर (मदर क्विन्स, सावंतवाडी), तृतीय हर्षिता राऊळ (मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव), उत्तेजनार्थ काव्या कुर्ले (न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा), नेहल मठकर (मदर क्विन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी).
​स्पर्धेचे उद्‍घाटन प्रा. रमेश कासकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाले. व्यासपीठावर वाचन मंदिराचे अध्यक्ष महेश खानोलकर, उपाध्यक्ष बाबली नार्वेकर, परीक्षक प्रा. एन. डी. कार्वेकर, प्रकाश तेंडोलकर, स्मिता नाईक, नेहा मेस्त्री उपस्थित होते. ​परीक्षक म्हणून प्रा. कार्वेकर, प्रकाश तेंडोलकर, स्मिता नाईक, नेहा मेस्त्री यांनी काम पाहिले. परीक्षक प्रा. कार्वेकर व श्री. तेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच (कै.) रमेश कासकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.
​विजेत्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र, भेटवस्तू तसेच रोख पारितोषिक देऊन गौरविले. स्पर्धेच्या सुरुवातीला वाचन मंदिरतर्फे घेतलेल्या दत्ताराम सडेकर पुरस्कृत निबंध लेखन स्पर्धेतील विजेत्यांना गौरविले. ​स्पर्धेला ग्रंथालयाचे संचालक हेमंत खानोलकर, शांताराम गवंडे, चंद्रकांत जाधव, माजी संचालक बाळकृष्ण मुळीक आदी उपस्थित होते. कार्यवाह स्नेहा खानोलकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात नवीन शासकीय विश्रामगृह; लष्कर परिसरात ४८ कक्षांची इमारत, ३३ कोटींचा खर्च, ४८ कक्ष उपलब्ध राहणार!

Nashik Municipal Corporation : नाशिकच्या महापौरपदासाठी भाजपचा 'सव्वा वर्षाचा फॉर्म्युला'! अडीच वर्षांत दोन महिलांना मिळणार संधी?

Union Budget 2026: मोठी बातमी! 15,000 शाळा व 500 कॉलेजमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब्स, गेमिंगमध्ये 10 लाख नोकऱ्यांचा मार्ग मोकळा

Nashik News : नाशिकच्या उद्योग जगतात सत्तांतर! 'आयमा'च्या अध्यक्षपदी राजेंद्र पानसरे यांचा दणदणीत विजय

मुंबई ओपन टेनिस: अंकिता रैनाची विजयी सलामी; आकांक्षा नित्तुरेवर मिळवला दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT