कोकण

सदर-सूर्यपूजा धार्मिक आस्थेपलीकडेही

CD

तळपत्या सूर्याचे दैवीत्व............. लोगो
(१८ जानेवारी पान ५)

सूर्यपूजा धार्मिक आस्थेपलीकडेही

महाराष्ट्रातील सूर्यपूजेची परंपरा ही भारतीय धार्मिक इतिहासाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. भारतातील इतर भागांप्रमाणेच येथेही सूर्यदेवतेची उपासना प्रागैतिहासिक काळापासून सुरू झाली असून, कालांतराने ती स्थानिक लोकदेवता, पंथीय चळवळी आणि विविध सांस्कृतिक घटकांशी समरस होत गेली. ‘मार्तंड’, ‘उग्रादित्य’, ‘लवणादित्य’, ‘कनकादित्य’ आणि ‘सूर्यनारायण’ अशी विविध नामरूपाने ही उपासना महाराष्ट्रात स्थिरावली. प्राचीन ताम्रपटांपासून ते लेण्यांतील कोरीवशिल्पांपर्यंत आणि पुराणिक संदर्भांपासून ते लोकपरंपरेतील रितिरिवाजांपर्यंत विविध स्वरूपांत सूर्यपूजेचे अस्तित्व महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते.
-rat३१p६.jpg-
26O21052
---मिलनाथ पातेरे
----
पुरातत्त्वीय साक्षांनुसार, सूर्यपूजेचे दुय्यम संदर्भ इ. स. पूर्व दुसऱ्या शतकात भाजे लेणी, पुणे आणि घरापुरी येथे आढळतात; मात्र, प्राथमिक स्थापत्य स्वरूपात सूर्यमंदिरांचा विकास ७ ते १२व्या शतकात चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार आणि यादव राजवटीत महाराष्टामध्ये झालेला दिसतो. यामध्ये महत्त्वाचे पुरावे म्हणजे वेरूळच्या लेणी क्र. २५ मधील सूर्यशिल्प तसेच विविध ताम्रपट दानपत्रे जसे मनोर (इ. स. ६९१), भंडक (इ .स. ७७१), भेरे (इ. स. ९९७), कशेली (इ. स. ११९१), मिरज (इ. स. १०५८) अशा ताम्रपटांमध्ये सूर्यमंदिर बांधणी, पूजा व दानाचे स्पष्ट उल्लेख आहेत. या स्थापत्यांचा विस्तार विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा या सर्व प्रमुख भौगोलिक क्षेत्रांमध्ये दिसतो. जळगावजवळील मेहूण येथील उग्रादित्य मंदिर हे राष्ट्रकूटकालीन आहे, ज्याची दुरुस्ती दोनवेळा झाल्याचा पुरावा उपलब्ध आहे तसेच अमरावती जिल्ह्यातील उदुंबरवती, ठाण्याजवळील लोनाड या ठिकाणी सूर्यपिठाचे स्पष्ट पुरावे ताम्रपटांच्या माध्यमातून मिळतात.
महाराष्ट्रातील सूर्यपूजेची उपस्थिती केवळ स्थापत्यपुरती मर्यादित नाही तर ती विविध पंथीय साहित्यांतूनही ठळकपणे दिसून येते. महानुभाव संप्रदायाच्या ग्रंथांमध्ये पैठण, नेवासा, भिंगार, चाचरमुडे (औरंगाबाद), सुगाव, अवलगाव, पालिमराळ, समवस्तर, खाटेगाव, नांदोर, चास, वाघोळी इत्यादी ठिकाणी ‘आदित्यमठ’ किंवा सूर्यपिठांचे उल्लेख आढळतात. याशिवाय कोकणातील परूळे, कशेळी, आजगाव, कोलधे, आरवली, कळघे, माखजन, सातर्डे आणि नेवरे इत्यादी गावांमध्ये सूर्यमंदिरे आणि त्यांची पूजापद्धती आढळतात. कशेळीतील सूर्यमंदिर आणि त्याच्या आख्यायिका सर्व जनमानसांमध्ये प्रसिद्ध आहेत तसेच धामापूरमधील बायजेवाडी येथील सूर्यमंदिर कालवश होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रातील सूर्यमंदिरे बहुधा मध्यकालीन आणि उत्तरकालीन मराठ्यांच्या स्थापत्यशैलीनुसार बांधलेली आढळून येतात. मूर्ती शास्त्रीयदृष्ट्या पाहता काही मूर्तींमध्ये सूर्य आणि विष्णू यांचे संयुक्त स्वरूप दिसते. विशेषतः १८व्या शतकामध्ये कोकणातील सूर्यमूर्ती या सूर्यनारायण स्वरूपात पुजण्यास सुरुवात झालेली दिसून येते जसे, रत्नागिरीतील कालभैरव, विठ्ठल रखुमाई, गुहागरमधील व्याडेश्वर, संगमेश्वर येथील रामेश्वर मंदिर हे त्यांची प्रमुख उदाहरणे देता येतील.
महाराष्ट्रात सूर्यपूजेशी निगडित असलेल्या अनेक लोकविधी आजही प्रचलित आहेत जसे रथसप्तमी, मकरसंक्रांती, वेला अमावस्या, सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याच्या परंपरा तसेच ‘रोट’ अर्पणाची विशिष्ट प्रथा यामध्ये दिसून येते. या खेरिज स्थानिक लोकदेवता जसे मार्तंड भैरव, खंडोबा, रावळनाथ यांच्यातून सूर्यपूजेचे मिश्रित स्वरूप प्रकट होते. कोकणातील परूळे येथील आदित्यनारायण मंदिर किंवा नेवरेतील आदित्यनाथ मंदिरासारखी स्थळे पुढे ‘कुलदैवत’ स्वरूपातही रूढ झालेली आपल्याला दिसून येतात. नेवरेतील आदित्यनाथ तर ग्रामदैवत म्हणून कार्य करतो आहे. या परंपरांचे स्वरूप जरी ग्रामीण आणि स्थानिक स्तरावर घटले असले तरी त्या महाराष्ट्रातील सौरउपासनेचा सांस्कृतिक अवशेष म्हणून आजही उभ्या आहेत. एकूण पाहता महाराष्ट्रातील सूर्यपूजा ही केवळ धार्मिक आस्था न राहता ती स्थापत्य, लोकपरंपरा, पंथीय तत्त्वज्ञान, आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून एक व्यापक परंपरा ठरते असे म्हणायला हरकत नाही.

(लेखक इतिहास आणि पुरातत्त्व अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

Railway recruitment: रेल्वेमध्ये तब्बल २० हजारांहून अधिक 'ग्रुप डी' पदांसाठी भरती सुरू ; इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

Rohit Shetty House Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारप्रकरणी पुण्यातून पाचजण ताब्यात, गॅंगस्टर बिश्नोई टोळीशी संबंधाचा संशय

SCROLL FOR NEXT