कोकण

चाल विचारांची, यश राष्ट्रपातळीचे

CD

21068

चाल विचारांची, यश राष्ट्रपातळीचे

‘मुक्ताई’चा डंका; बुद्धिबळ स्पर्धेत आठ खेळाडूंचे यश

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३१ ः हुबळी (कर्नाटक) येथील डॉ. प्रभाकर कोरे केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी यांच्यातर्फे रिपब्लिक कप राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा रॅपिड आणि ब्लिट्ज या दोन प्रकारात घेण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून येथील मुक्ताई ॲकॅडमीच्या आठ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
या स्पर्धेत भारत, अमेरिका, मलेशिया या देशातील तब्बल ३४८ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यात मुक्ताई ॲकॅडमीच्या बाळकृष्ण पेडणेकर, हर्ष राऊळ, तनिष तेंडोलकर, विघ्नेश अंबापूरकर, पुष्कर केळूसकर, अथर्व वेंगुर्लेकर, योगी लेले, राजेश विरनोडकर यांचा सहभाग होता. बाळकृष्ण याने रॅपिड स्पर्धेत नऊ पैकी सहा राऊंड्स जिंकून आणि एक बरोबरीत सोडवून साडेसहा गुण मिळविले. तसेच ब्लिट्ज स्पर्धेत पाच राऊंड्स जिंकून आणि दोन बरोबरीत सोडवून सहा गुण मिळविले. त्याने रॅपिड स्पर्धेत मुख्य गटात सोळावा आणि ब्लिट्ज स्पर्धेत अठरावा क्रमांक पटकावला. त्याला रोख रक्कम आणि सुवर्णपदक देऊन गौरविले. बाळकृष्णने आंतरराष्ट्रीय रेटिंग दहा गुणांनी वाढवले. तनिष याने रॅपिड स्पर्धेत चार राऊंड्स जिंकून आणि तीन बरोबरीत सोडवून साडेपाच गुण मिळवून सोळा वर्षांखालील मुलांच्या गटात पहिला क्रमांक मिळविला. हर्ष याने रॅपिड स्पर्धेत चार राऊंड्स जिंकून आणि दोन बरोबरीत सोडवून पाच गुणांसह चौदा वर्षांखालील मुलांच्या गटात चौथा क्रमांक मिळवला. दोन्ही विद्यार्थ्यांना चषक देऊन गौरविण्यात आले. या दोघांनी आपले आंतरराष्ट्रीय रेटिंग सोळा गुणांनी वाढवले.
---------
दहा वर्षांत उल्लेखनीय यश
आठ वर्षीय विघ्नेश अंबापूरकर याने दहा वर्षांखालील गटात ब्लिट्ज स्पर्धेत आठवा आणि रॅपिड स्पर्धेत नववा क्रमांक मिळवला. पुष्करने चौदा वर्षांखालील मुलांच्या गटात दहावा क्रमांक मिळविला. दोघांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मागील दहा वर्षांत सिंधुदुर्ग जिल्हा आणि राज्याचे प्रतिनिधित्व करताना सातत्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. पाटणकर वाड्याचे दिलीप पाटणकर, अश्विनी पाटणकर आणि सुशांत पाटणकर यांनी मुलांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

Rohit Shetty House Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारप्रकरणी पुण्यातून पाचजण ताब्यात, गॅंगस्टर बिश्नोई टोळीशी संबंधाचा संशय

Baramati Crime News : बारामतीत चोरटयांनी 25 लाखांचे दागिने केले लंपास; अजित पवार यांच्या अंत्यविधीप्रसंगी चोरटयांचा धुमाकूळ....

SCROLL FOR NEXT