- rat१p९.jpg-
P२६O२११८५
सोहम जाधव
इंग्रजी शब्द पाठांतरात
सोहम जाधव द्वितीय
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १ : संगमेश्वर तालुक्यातील मारळ येथे नुकत्याच पार पडलेल्या केंद्रस्तरीय इंग्रजी शब्द पाठांतर स्पर्धेत आंगवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा इयत्ता चौथीचा विद्यार्थी सोहम नीलेश जाधव याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तालुक्यातील मारळ येथील जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळेत ही केंद्रस्तरीय स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत मारळ, आंगवली, बामणोली, कासारकोळवण, आंगवली रेवाळेवाडी, निवधे, मारळ धनगरवाडी आणि बोंड्ये या आठ शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.
ही स्पर्धा एकूण चार आव्हानात्मक फेऱ्यांमध्ये घेण्यात आली. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांकडून इंग्रजी शब्द लिहून घेणे, ठराविक शब्द पूर्ण करणे, तोंडी विचारलेल्या शब्दांचे स्पेलिंग सांगणे आणि अक्षरे मागे-पुढे करून त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे अशा विविध चाचण्या घेण्यात आल्या. या सर्व फेऱ्यांमध्ये सोहमने उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले. या स्पर्धेवेळी मारळ केंद्रप्रमुख नरेश सावंत, केंद्रातील सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बामणोली शाळेच्या शिक्षिका संचिता सुर्वे यांनी विशेष मेहनत घेतली, तर केंद्रातील सर्व शिक्षकांचेही बहुमोल सहकार्य लाभले. सोहमच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.