21320
कनेडी हायस्कूल तिसऱ्यांदा प्रथम
‘मुख्यमंत्री माझी शाळा’ उपक्रमात यश
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १ : ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमामध्ये सलग तिसऱ्या वर्षी तालुक्यातील कनेडी माध्यमिक विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेजने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला.
प्रशालेने जिल्ह्यातील २३२ माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालांतून सलग दोन वर्षे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले होते. शैक्षणिक सोयी-सुविधा, शैक्षणिक साहित्य, प्रशाला इमारत, शैक्षणिक गुणवत्ता, दहावी-बारावी निकाल, स्कॉलरशिप, एनएमएमएस, शासकीय चित्रकला, रेखाकला परीक्षा, शालेय आणि शाळाबाह्य स्पर्धा परीक्षांमध्ये राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर मिळालेले सुयश, सांस्कृतिक विभागात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर मिळालेले सुयश, शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर मिळालेले सुयश, शिक्षकांनी शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये दिलेले योगदान, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशालेने केलेले प्रयत्न आणि मिळालेले यश, तसेच शैक्षणिक क्षेत्राबरोबरच प्रशालेचे सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, सहकार, व्यावसायिक क्षेत्रामध्ये दिलेले योगदान या सर्व घटकांचे चिकित्सक मूल्यमापन तज्ज्ञ परीक्षकांकडून करून क्रमांक काढला जातो.
‘जिल्हा पातळीवरही या प्रशालेने यंदा घवघवीत यश प्राप्त करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले आहे. आता विभागीय पातळीवर ही प्रशाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नक्कीच प्रतिनिधित्व करेल,’ असा विश्वास संस्था पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. प्रशालेच्या या यशानिमित्त संस्थाध्यक्ष सतीश सावंत आणि पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन आर. एच. सावंत आणि सदस्य आणि पालकांनी प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, तसेच सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.