कोकण

एकाग्र मनाने ज्ञान आत्मसात करा

CD

21338

एकाग्र मनाने ज्ञान आत्मसात करा

गावडेकाका महाराज ः माड्याचीवाडीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ ः मन एक अद्भूत शक्ती आहे. यातून एकाग्र मनाने उन्नती साधून करियर घडवा, असे प्रतिपादन सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांनी केले.
श्री सदगुरू भक्त सेवा न्यास रजि. माड्याचीवाडी या संस्थेच्या माध्यमातून माड्याचीवाडी येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थांसाठी ‘मन ही एक अद्भूत शक्ती’ या एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. याचे उद्‍घाटन श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सदगुरू गावडेकाका महाराज यांच्या हस्ते  दीपप्रज्वलनाने झाले.
यावेळी तज्ज्ञ शिक्षक सुहास आंबेस्कर, श्री. राणे, योग शिक्षक आनंद सावंत, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, संस्थेचे अध्यक्ष राकेश केसरकर, धार्मिक संस्थेचे अध्यक्ष एकनाथ गावडे, खजिनदार गौरव मुंज, विश्वस्त केसर वानिवडेकर, दत्तात्रय किनळेकर उपस्थित होते.
गावडेकाका महाराज म्हणाले, ‘‘जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट शक्य आहे. अशक्य असे काही नाही. मनावर ताबा ठेवून आपल्याप्रमाणे शिकवलं, एकाग्रतेचा प्रयत्न केला, तर आपण ज्ञान आत्मसात करू शकतो. मन ही अद्भूत शक्ती असून ती जागृत करून आपल्यातली कला-कौशल्ये जोपासावीत. मोबाईलमध्ये भरकटत चाललेल्या मनाला एकाग्र करा. चंचल मनात येणारे विचार कसे दूर करता येतील, यादृष्टीने प्रयत्न करा. भरकटलेल्या मनाला एकाग्र करून अभ्यासात प्रावीण्य मिळवा.’’
आंतराष्ट्रीय योग शिक्षक आनंद सावंत यांनी योगीक सिद्धांतानुसार विषेश मार्गदर्शन, आजच्या स्पर्धात्मक शैक्षणिक वातावरणात परीक्षेची भीती, मानसिक ताणतणाव, स्मरणशक्ती कमी होणे, एकाग्रतेचा अभाव, आत्मविश्वास ढासळणे या सर्व समस्यांवर शास्त्रशुद्ध अनुभवावर आधारीत उपायांद्वारे मार्गदर्शन केले. ताणतणाव कमी करण्यासाठी प्राणायाम, योगासने, विविध मुद्रा, त्राटक डोळे व मन एकाग्र करण्याची प्रभावी योग साधना आहे, असे त्यांनी सांगितले. श्री. आंबेस्कर व राणे यांनी इंग्लिश, गणित, मराठी व विज्ञान या विषयांवर मार्गर्शन केले. निसर्गोपचार तज्ज्ञ, रेकी मास्टर व अध्यात्मिक सदगुरू गावडेकाका महाराज यांनी केले. आनंद सावंत यांनी सूत्रसंचालन केले. गौरव मुंज यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026: अर्थसंकल्पात मत्स्यव्यवसायाला नवे बळ! कोळंबी आणि इतर मासे खाद्य स्वस्त होणार; सीफूड निर्यातीसाठी मोठा निर्णय

U19 World Cup, IND vs PAK: वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद, पण वेदांत त्रिवेदीचं झुंजार अर्धशतक, भारताचे पाकिस्तानसमोर मोठं लक्ष्य,

Indian Royal Family : भारतातील 5 महान राजांचे वंशज काय आज करतायत? कसे आहे त्यांचे जीवन..पाहा ऐतिहासिक वारसा

Ranji Trophy 2026 : थोडी खुशी जादा गम! उत्तरप्रदेशला नमवूनही विदर्भ संघ स्पर्धेबाहेर, मोखाडे अन् मालेवार विजयाचे शिल्पकार

‘क्रांतिज्योती विद्यालय...’च्या यशानंतर ‘मराठी शाळा योजना’ची सुरुवात

SCROLL FOR NEXT