कोकण

प्रत्येक गावाचा विकास हेच ध्येय

CD

swt21.jpg
21507
डिगस ः आमदार नीलेश राणे यांचे स्वागत करताना उमेदवार दादा साईल. बाजूला निखिल कांदळगावकर व इतर. (छायाचित्र ः अजय सावंत)

प्रत्येक गावाचा विकास हेच ध्येय
नीलेश राणे ः डिगस, सोनवडेत शिवसेनेच्या प्रचार बैठका
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ ः ‘‘गेल्या दहा वर्षांमध्ये अनेक गावांना विकासापासून वंचित ठेवणारे माजी आमदार वैभव नाईक यांनी आता जी विकासकामे होत आहेत, त्यांच्या तक्रारी सुरू केल्या आहेत. म्हणजेच स्वतः आमदार असताना विकास करायचा नाही आणि लोकांनी घरी बसविल्यावर सुद्धा विकासाला विरोध करायचा, या प्रवृत्तीला जनतेने मतपेटीच्या माध्यमातून उत्तर देण्याची गरज आहे. कोणती ग्रामपंचायत आमच्या विरोधात आहे, हे आम्ही पाहणार नाही, तर प्रत्येक गावाचा विकास हेच आमचे ध्येय असणार आहे,’’ असे प्रतिपादन आमदार नीलेश राणे यांनी केले. तालुक्यातील सोनवडे, डिगस या ठिकाणी आयोजित केलेल्या प्रचार दौऱ्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार राणे यांनी तालुक्यातील पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातील सोनवडे, डिगस या गावांमध्ये प्रचार दौरे केले. यावेळी त्यांनी खळा बैठका घेतल्या. या बैठकांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, निरीक्षक अरुण सावंत, ओबीसी सेलचे श्रीधर पेडणेकर, जिल्हा उपप्रमुख अरविंद करलकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, जिल्हा सचिव तथा पावशी मतदारसंघाचे उमेदवार दादा साईल, डिगस पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार निखिल कांदळगावकर, सोनवडे सरपंच योगिता धुरी, उपसरपंच नाजुका सावंत, माजी सभापती अभय परब, माजी सरपंच बाबल धुरी, नागेश परब, सुधीर धुरी, पावशी सरपंच वैशाली पावसकर, पावशी माजी सरपंच श्रीपाद तवटे, श्री. तेंडुलकर, विनायक अणावकर, डिगस माजी सरपंच नित्यानंद कांदळगावकर, रमेश घोगळे, अरुण सावंत, शेखर गोसावी, धोंडी सुर्वे, विजय लुडबे आदी उपस्थित होते.
आमदार राणे म्हणाले, ‘‘ग्रामीण भागांना विकासापासून वंचित ठेवण्याचे काम माजी आमदार नाईक यांनी केले आहे. सध्या होणाऱ्या कामांच्या तक्रारी करून अजूनही ते या गावांना वंचित ठेवण्याचे काम करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण अशा तक्रारींना घाबरणारे आम्ही नाही. विकास प्रक्रिया थांबणार नाही. विरोधकांकडे जनतेला देण्यासाठी काही नाही, मग त्यांचे उमेदवार निवडून देण्याचीही गरज नाही. प्रत्येक गावाचा विकास हेच आमचे ध्येय असणार आहे. प्रत्येक गावामध्ये विकास निधी गेला पाहिजे. कोणालाही विकासापासून वंचित ठेवणार नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Congress: चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा दुसरा गट स्थापन होणार; पक्षातला अंतर्गत वाद दिल्ली दरबारी

काय करते ओक कुटुंबाची होणारी मोठी सून? सिनेसृष्टीपासून आहे कोसो दूर; प्रसाद - मंजिरीने शेअर व्हिडिओ

Latest Marathi News Live Update: अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी झाली पाहिजे, रुपाली ठोंबरे-पाटील यांची मागणी

Gold Loan : बँकेत जर 10 ग्रॅम सोनं गहाण ठेवल तर किती कर्ज मिळतं? किती पैसे वापरायला मिळतात? जाणून घ्या सर्व माहिती

Jalgaon News : शनिपेठ पोलिस ठाण्याचा कायापालट! ४.४३ कोटींच्या निधीतून उभारणार भव्य नवीन इमारत

SCROLL FOR NEXT