swt23.jpg
21509
पावशी ः चर्मकार समाज संघटनेच्या वतीने संत शिरोमणी रविदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
रोहिदासांचे विचार समाजात पोहोचवा
पंढरी चव्हाणः पावशीत चर्मकार समाज संघटनेतर्फे जयंती
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ ः ‘‘संत रोहिदास महाराजांचा आदर्श प्रत्येकाने आत्मसात केला पाहिजे. त्यांची विचारधारा समाजात पोहोचवली पाहिजे,’’ असे प्रतिपादन भारतीय चर्मकार समाजाच्या राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण यांनी रविवारी (ता. १) पावशी येथे संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीदिनी केले.
भारतीय चर्मकार समाज संघटनेच्या वतीने संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती पावशी येथे समाजाचे पदाधिकारी बाबल पावसकर यांच्या निवासस्थानी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण, जिल्हाध्यक्ष बाबल पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष सहदेव चव्हाण, कोकण युवा अध्यक्ष भारत पेंडुरकर, महिला जिल्हा अध्यक्ष मानसी चव्हाण, महिला जिल्हा उपाध्यक्ष प्रतिभा चव्हाण, महिला मालवण तालुकाध्यक्ष साक्षी चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष मंगेश चव्हाण, ज्येष्ठ सल्लागार रमेश कुडाळकर, जिल्हा कोषाध्यक्ष रघुनाथ चव्हाण, जिल्हा सहसचिव अंकुश चव्हाण, कुडाळ तालुकाध्यक्ष नंदकिशोर तेंडोलकर, कुडाळ उपाध्यक्ष बॉबी पावसकर उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, ‘‘आपला समाज न्याय्य प्रश्नांसाठी संघटितरीत्या एका छत्राखाली येणे आवश्यक आहे. आज आपला समाज मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे. समाजासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्या योजना तळागाळात पोहोचण्यासाठी काम केले पाहिजे. संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. विशेष म्हणजे संत रोहिदास महाराजांचे आदर्श विचार सोबत घेऊन आपण तळागाळात पोहोचलो पाहिजे. युवापिढी या समाज चळवळीत मोठ्या प्रमाणात उतरली पाहिजे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.