swt2१२.jpg
दोडामार्ग ः हळबे महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये.
हॉटेल, पर्यटन क्षेत्रात करिअर करा
चंद्रकांत शेट्ये ः दोडामार्ग महाविद्यालयात ‘तडका’ फेस्टिव्हल
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २ : आजच्या युगात स्पर्धा खूप वाढलेली आहे; मात्र स्पर्धेमुळेच गुणवत्ता टिकून राहते, म्हणून चांगली स्पर्धा कायम आवश्यक असते. आज हॉटेल आणि पर्यटन व्यवसायामध्ये देश-परदेशात करिअरच्या विविध संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात निष्ठेने काम करावे, ग्राहकांशी प्रामाणिकपणे वागावे आणि गुणवत्तेला महत्त्व द्यावे, असे प्रतिपादन डिचोली-गोव्याचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी केले.
येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयातील हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्रीयन तडका’ या फूड फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी आमदार शेट्ये बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी सडेकर एनवियरो इंजिनियर्स प्रा. लि. चे संचालक प्रभाकर सडेकर, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, सदस्य मृत्युंजय खातू, कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य राजेंद्र केरकर व डॉ. हेमंत पेडणेकर, नगरसेविका गौरी पार्सेकर व संध्या प्रसादी, संदीप देसाई, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मनोज पार्सेकर, न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, भेडशीचे प्राचार्य नंदकुमार नाईक, माजी सरपंच यशवंत बागकर, रंगखांब कला मंचाचे प्रा. हरिभाऊ भिसे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, हॉटेल मॅनेजमेंट विभागाचे प्रमुख प्रा. रोहन बागकर आदी उपस्थित होते.
श्री. सडेकर यांनी गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील हे महाविद्यालय उल्लेखनीय कार्य करत असल्याचे नमूद केले. नगराध्यक्ष चव्हाण यांनी दोडामार्गच्या विकासाचा आढावा घेतला. हेगशेट्ये यांनी गेल्या पंचवीस वर्षांतील आठवणींना उजाळा देत महाविद्यालयाचा प्रवास उपस्थितांसमोर मांडला. प्रा. सावंत यांनी कॉलेजच्या पंचवीस वर्षांतील कार्याचा थोडक्यात आढावा घेतला.
यावेळी ‘नवनिर्माण’ या रौप्यमहोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. दिलीप बर्वे, कल्पेश गवस यांना सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. संजय खडपकर यांनी केले. आभार डॉ. सोपान जाधव यांनी मानले. त्यानंतर कणकवली येथील लोककलेचा जागर करणाऱ्या प्रसिद्ध ‘रंगखांब’ने उपस्थितांची मने जिंकली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.