कोकण

कर सल्लागार असोसिएशनतर्फे अर्थसंकल्प सेमिनार

CD

rat२p१२.jpg-
P२६O२१५१५
रत्नागिरी : कर सल्लागार असोसिएशनतर्फे डॉ. अक्षय फाटक यांना विशेष पुरस्कार प्रदान करताना सीए एच. एल. पटवर्धन. सोबत रमाकांत पाथरे, अभिजित पटवर्धन, ऋषिकेश फडके आदी.
----
कर सल्लागारांचा अर्थसंकल्पीय संवाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : रत्नागिरी जिल्हा कर सल्लागार असोसिएशनच्यावतीने हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे केंद्रीय अर्थसंकल्पावरील सेमिनारचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय अर्थसंकल्पीय सत्राचे थेट प्रक्षेपण सदस्यांसाठी पाहण्याची व्यवस्था करण्यात आली. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील बहुतांशी करसल्लागार सदस्य उपस्थित होते.
अर्थसंकल्प सत्रानंतर दुपारी असोसिएशनतर्फे वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात पार पडला. सायबर सुरक्षा, समाजहित व जनजागृती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. अक्षय फाटक यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या सभासदांपैकी क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या निशा आंबेकर व राजेंद्र भावे यांचा देखील पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ज्येष्ठ सीए एच. एल. पटवर्धन यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर कर सल्लागार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष रमाकांत पाथरे, उपाध्यक्ष सीए अभिजित पटवर्धन, खजिनदार सीए ऋषिकेश फडके उपस्थित होते. संस्थेचे सचिव ॲड. रवींद्र साळवी व कार्यकारिणी सदस्य धनेश रायकर यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Congress: चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा दुसरा गट स्थापन होणार; पक्षातला अंतर्गत वाद दिल्ली दरबारी

काय करते ओक कुटुंबाची होणारी मोठी सून? सिनेसृष्टीपासून आहे कोसो दूर; प्रसाद - मंजिरीने शेअर व्हिडिओ

Latest Marathi News Live Update: अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी झाली पाहिजे, रुपाली ठोंबरे-पाटील यांची मागणी

Gold Loan : बँकेत जर 10 ग्रॅम सोनं गहाण ठेवल तर किती कर्ज मिळतं? किती पैसे वापरायला मिळतात? जाणून घ्या सर्व माहिती

Jalgaon News : शनिपेठ पोलिस ठाण्याचा कायापालट! ४.४३ कोटींच्या निधीतून उभारणार भव्य नवीन इमारत

SCROLL FOR NEXT