Touchless hand sanitizing machine lockdown holidays made by aaryan 
कोकण

भरीच की : रत्नागिरीत सातवीत शिकणाऱ्या आर्यनने बनवले टचलेस हँड सॅनिटायझिंग मशिन...

मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : नेहमी शोधक वृत्ती असलेल्या येथील सातवीत शिकणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांने लॉकडाउनच्या सुट्टीच्या काळात टचलेस हँड सॅनिटायझिंग मशिन तयार केले आहे. आर्यन आनंद सावंत असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो येथील शिर्के प्रशालेत शिकतो. नेहमीच काहीतरी वेगळे करायचे अशा हेतूने  धडपडणाऱ्या आर्यन च्या कोरोनासंसर्ग च्या  पार्श्वभूमीवर सुचलेली ही भन्नाट आयडिया आता कौतुकाची ठरले आहे.

असे बनवले मशिन

गेले दोन-तीन महिने घरातच सुरक्षित राहून शालेय विद्यार्थ्याने टचलेस हँड सॅनिटायझिंग मशिन साकारले आहे. त्याकरिता सेन्सर सिस्टीम वापरली असून हात पुढे नेला की सॅनिटायझरचे 1-2 थेंब पडतात. त्यामुळे सॅनिटायझरचा अतिवापर होत नाही. टचलेस सॅनिटायझिंग लहान स्वरूपात आहे. सातवीत शिकणारा आर्यन नाचणे, आयटीआयनजीक राहतो. या उपकरणासाठी त्याला शिक्षक वडिल डॉ. आनंद व आई सौ. अनुश्री यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

आर्यनने त्याने सांगितले, घरच्या घरी प्लायवुडपासून हे उपकरण बनवले आहे. आरडीनोे ओनो, आय. आर. सेन्सर व रिले मॉडेल, अ‍ॅडाप्टर, वॉटर पंपचा वापर केला आहे. मोबाईलमार्फत येणारा पॉवर सप्लाय आरडीनो ओनोकडे पाठवण्यात आला आहे. चार्जिंग सेलचाही वापर पॉवर सप्लायसाठी करता येऊ शकतो.


खोक्यामध्ये सॅनिटायझर डबा ठेवला असून त्याला पाईप लावून तो बॉक्सच्या बाहेर काढला व त्याला स्टीलचा छोटा पाईप जोडलाय. पाईपला लागूनच मशीन बॉक्सला सेन्सर बसवला आहे. हात सेन्सरच्या समोर ठेवला असता पाईपमधून 1 ते 2 थेंब सॅनिटायझर हातावर पडते. मर्यादित सॅनिटायझर येत असल्याने त्याची बचत होते. घर, शासकीय कार्यालय, दुकान आदी ठिकाणी या उपकरणाचा वापर करता येऊ शकतो. या मशीनमध्ये कोणतेही सॅनिटायझर वापरता येत असल्याचे आर्यनने सांगितले. 

आर्यनने बनवलेले ‘कोरोना युद्ध जिंकूया’ हे गाणे यू-ट्यूबवर गाजले. त्याची दखल तहसीलदार, प्रांताधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांनीही घेतली आहे. आर्यन हरहुन्नरी असून आतापर्यंत त्याने डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा, नोव्हेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा, अटल टिकरिंग लॅब संशोधन प्रकल्प, विज्ञान प्रदर्शनात व्हाईस कंट्रोल कार प्रतिकृतीची निर्मिती केली.

“वैज्ञानिक उपक्रमाकडे आर्यनचा लहानपणापासून कल आहे. तो नवनवीन प्रयोग करत असतो आणि त्याच्या मनातील गोष्टी तो आम्हाला सांगतोे. टचलेस सॅनिटायझिंग मशीनबद्दल आम्हाला खूप कौतुक वाटते.”
- सौ. अनुश्री सावंत, डॉ. आनंद सावंत.

.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Return: वेलकम शुभांशु! अंतराळात तिरंगा फडकवून पृथ्वीवर परतले शुभांशु शुक्ला, कॅलिफोर्नियाच्या समुद्रावर केलं लँडिंग

Mumbai Rain: मुंबईत जोरदार पाऊस! अनेक भागात पाणी साचले, विमानांचे वेळापत्रक बिघडले अन्...; जाणून घ्या स्थिती

Crime News: धावत्या बसमध्ये प्रसूती; नवजात बाळाला रस्त्यावर फेकून दिल्याची अमानुष घटना

Mumbai News: मुंबईतील २० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याची चौकशी करा, भाजपची पालिका आयुक्तांकडे मागणी

Shubhanshu Shukla Return Live : अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले

SCROLL FOR NEXT