sindhduruga
sindhduruga  sakal
कोकण

पर्यटनस्थळे सरसकट बंद नकोत; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील पर्यटनस्थळे(toirist spots in sindhudurga) व जलक्रीडा व्यवसाय सरसकट बंद ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे पर्यटन व्यवसायिकांवर(tourist business) उपासमारीची वेळ येणार आहे. तरी पर्यटनस्थळे व जलक्रीडा व्यवसाय सरसकट बंद न ठेवता कोरोना निर्बंधासह(corona restrictions) चालू ठेवण्याबाबत आदेश व्हावेत, व्यावसायिकांना शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग पर्यटन व्यवसायिक महासंघाच्यावतीने आज जिल्हाधिकारी(collector k. manjulakshmi) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.जिल्ह्यातील शेकडो पर्यटक व्यावसायिक एकत्र येत आज जिल्ह्यात बंद ठेवलेल्या पर्यटन व्यवसायाबाबत जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळे व जलक्रीडा व्यवसाय सरसकट बंद करण्याचा निर्णय घेतल्याने पर्यटन व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. तरी बंद केलेले व्यवसाय पुन्हा कोरोनाच्या निर्बंधासह सुरू करावेत व व्यावसायिकांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय कोरोनामुळे गेली दोन वर्ष बंद स्थितीत आहे. नोव्हेंबरपासून थोड्या फार प्रमाणात हा व्यवसाय पूर्वपदावर येत असताना ओमिक्रॉन व कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरसकट पर्यटनस्थळे व जलक्रीडा व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश स्थानिक प्रशासनामार्फत देण्यात आले आहेत. ते अन्यायकारक व चुकीचे असून जिल्ह्यातील पर्यटन स्थळे निर्बंधासह चालू करण्यात यावीत, सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक, जलक्रीडा व्यवसाय सुरू करण्याचे आदेश देण्यात यावे, कोरोना काळात पर्यटन व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणातनुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे व जलक्रीडा व्यवसाय बंद ठेवण्याच्या निर्णयात बदल न झाल्यास या व्यवसायावर अवलंबून असणार्‍या वाहन चालक, टूर गाईड, हॉटेल, रेस्टॉरंट, रिक्षा चालक, स्कुबा ड्रायव्हिंग, जलक्रीडा व्यावसायीक, सिंधुदुर्ग किल्ला होडी चालक यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. व्यवसाय करण्यासाठी घेतलेले बँकेची कर्ज व्याज आणि लाईट बिल भरण्यासाठी व्यवसायिकांना कसरत करावी लागणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा (sindhudurga tourism)असूनही या जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरी जिल्हा प्रशासनाने याबाबत योग्य तो निर्णय घेऊन जिल्ह्यातील सर्व पर्यटन व्यवसाय कोरोनाच्या निर्बंधासह(corona restrictions) सुरू ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सिंधुदुर्ग पर्यटन व्यवसाय महासंघाच्यावतीने करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यवसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू उर्फ बाबा मोडकर यांच्यासह नकुल पार्सेकर, सतीश पाटणकर, किशोर दाभोळकर, ध्रुवबाळ सावंत, सहदेव साळगावकर, मेघा गावकर, चारुशीला आचरेकर, तनिष्का कासवकर, मिलिंद लाड, मंगेश जावकर, श्वेता सावंत, विद्या फर्नांडिस उपस्थित होते.(collector k. manjulakshmi )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई हायवेवर वाहतूक कोंडी, वाहतूक संथ गतीने

SCROLL FOR NEXT