श्रीवर्धन तालुक्‍यातील जावेळे पुलाचा भाग ढासळल्याने अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. 
कोकण

'या' तालुक्यातील पाच गावांचा संपर्क तुटण्याची शक्‍यता; पुलाचा भाग ढासळल्याने वाहतूक बंद

महेंद्र दुसार : सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : श्रीवर्धन तालुक्‍यातील जावेळे नदीवरील जुना पूल 5 ऑगस्ट रोजी पडलेल्या जोरदार पावसाने अधिकच कमकुवत झाला आहे. या पुलाचा काही भाग सोमवारी ढासळला होता. त्याची पाहणी श्रीवर्धन पंचायत समिती सभापती बाबुराव चोरगे यांनी मंगळवारी पाहणी केली. त्यात पूल मध्यभागी खचल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक पूर्णतः थांबवण्यात आलेली आहे.

साधारणतः 40 वर्षांपूर्वी दगडी स्वरूपात बांधलेल्या पुलाच्या वरच्या बाजूस सिमेंट व लोखंडाचा वापर केलेला आहे. या पुलाच्या दुतर्फा सिमेंटचे एक फुटाचे संरक्षक कठडे बांधलेले आहेत. मात्र, पुलाचा आधार असलेल्या तीन संरक्षक भिंतींपैकी एक संरक्षक भिंत ढासळण्यास सुरुवात झाली आहे. 5 ऑगस्टच्या मुसळधार पावसामुळे हा पूल अधिकच कमकुवत झाल्याने सोमवारी याचा काही भाग ढासळला. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मनोहर सावंत या व्यक्तीने श्रीवर्धन तहसीलदार सचिन गोसावी यांच्याकडे दूरध्वनीद्वारे सोमवारी सायंकाळी कळवली होती. त्यानंतर तहसीलदारांनी तत्काळ दखल घेत हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. 

या पुलावरून वडशेत वावे, धारवली, आडी कोलमंडला, साखरोने, कारवीने या गावांचे दळणवळण चालते. मात्र, आजमितीस कोणतेही अवजड वाहन पुलावरून गेल्यास अपघात होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे श्रीवर्धन पोलिस दलाने पुलाच्या दोन्ही मार्गांवर पूल वाहतुकीस बंद असल्याबाबतचे मार्गरोधक लावलेले आहेत. मार्ग बंद झाल्याने या पाच गावांचा संपर्क तुटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

दरम्यान, या पुलाची पाहणी पंचायत समिती सभापती बाबुराब चोरगे, गटविकास अधिकारी बाळासाहेब भोगे, जावेळे सरपंच व ग्रामस्थ यांनी मंगळवारी केली. या वेळी पुलाच्या बरोबर मध्यभागी काही अंशी पूल खचला असल्याचे या वेळी निदर्शनास आले. तसेच, पुलावर पावसामुळे दोन्ही बाजूला गवत उगवलेले दिसले. या पुलाच्या खालून जावेळे नदीचा प्रवाह जोरात वाहत असतो. त्यामुळे कोणतेही चारचाकी वाहन पुलावरून गेल्यास अपघाताची शक्‍यता अधिक आहे. 

वडशेत वावे गावातील व्यक्तीने पूल ढासळण्यास सुरुवात झाल्याची माहिती कळवल्यानंतर तत्काळ संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणेला याविषयी आदेश निर्गमित केले. सद्यस्थितीत जावेळे पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. 
- सचिन गोसावी, तहसीलदार, श्रीवर्धन 

मंगळवारी सकाळी जावेळे पुलाची पाहणी केली. सद्यस्थितीत पूल वाहतुकीस धोकादायक बनलेला आहे. मात्र, गणेशोत्सव असल्याकारणाने नागरिकांची गैरसोय होऊ नये, या अनुषंगाने संबंधित बांधकाम खात्याने तत्काळ पर्यायी उपाययोजना करणे गरजेचे आहे. 
- बाबुराव चोरगे, सभापती,
श्रीवर्धन पंचायत समिती  

(संपादन : उमा शिंदे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd ODI : विराट कोहलीचं सातत्य, वाढवतंय रोहित शर्माचं टेंशन! आज असं काही घडल्यास, बसेल 'हिटमॅन'च्या साम्राज्याला धक्का

Ichalkaranji Election : इचलकरंजीचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार; मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही, चंद्रकांत पाटीलांचा दावा

Latest Marathi News Live Update : ठाण्यात प्रचाराच्या नावाखाली प्रभाग क्रमांक ०६ मध्ये पैसे वाटप

Ladki Bahin Yojana : हजारो महिलांचा आर्थिक आधार धोक्यात! गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नांमुळे अनुदान मिळणे बंद

मायनस ४० गुण आणि शून्य टक्के असले तरी MD, MS करता येणार, NEET PG चा कटऑफ केला कमी; रिक्त जागा भरण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT