kokan
kokan sakal
कोकण

पोलिस अधिकाऱ्यासह दोघांचा आचऱ्यात मोटारीच्या धडकेत मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

आचरा : आचरा हायस्कूलजवळ भरधाव मोटारीने तिघा पादचाऱ्यांना उडविले. यात पोलिस अधिकारी आणि मठाचे आचारी या दोघांचा मृत्यू झाला, तर एक मुलगी गंभीर जखमी झाली. पोलिस उपनिरीक्षक दीपक लोणे (वय ५७) व मठाचे आचारी जमेंदर प्रसाद (५०) अशी मृतांची नावे आहेत. अपघात रविवारी (ता.३) रात्री उशिरा घडला.

याप्रकरणी आचरा पोलिसांनी कणकवली जानवली येथील कृष्णा राणे (६०) यांना गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मोटारीही ताब्यात घेतली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी- सुटीवर आलेले पोलिस उपनिरीक्षक लोणे रात्री सव्वादहाच्या सुमारास आचरा तिठा येथून जेवण आटोपून मुलगी परी व मठाचे आचारी जमेंदर प्रसाद यांच्यासह पायी घरी जात होते. पाठीमागून भरधाव मोटारीने तिघांनाही जोरदार धडक दिली. त्यात लोणे यांच्या डोक्याला, कंबरेला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या मुलीच्या डाव्या हाताच्या कोपराला व पोटाला दुखापत झाली.

प्रसाद यांच्या डोक्याला व डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती समजताच गौरव पेडणेकर, विलास आचरेकर, दीपक आचरेकर, नीलेश राणे, विक्रांत राणे, आचरेकर, साजित नायर, छोटू पांगे आदींनी धाव घेत जखमींना पेडणेकर यांच्या रिक्षाने आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. गंभीर दुखापतीमुळे तिघांनाही रात्री कणकवली येथे हलविण्यात आले होते; मात्र यात लोणे व प्रसाद यांचा मृत्यू झाला. परी (वय १६) गंभीर जखमी आहे.

स्वामी भक्त म्हणून प्रसिद्ध असलेले लोणे ठाण्यातील डहाणू-पालघर पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक होते. त्यांनी ठाणे सिव्हिल हॉस्पिटल बाजूला २००८ मध्ये स्वामी समर्थ मठ स्थापन करून येथे हजारो लोकांना चहा, नाष्टा व दोनवेळच्या जेवणाची अविरत मोफत व्यवस्था केली होती. ते २०१७ पासून आचरा वरचीवाडी येथेही भगवंत गड रस्त्यालगत शिक्षक कॉलनी येथे स्वामी समर्थ मठ स्थापून अन्नदानाचे पवित्र कार्य सुरू केले होते. मठाच्या माध्यमातून लोणे यांच्या सहकार्याने कोरोना काळात येथील स्वामी भक्तांच्या सहकार्याने हजारो लोकांना मोफत धान्य वाटप केले जात होते. मठामार्फत शीतशवपेटीही उपलब्ध करून देण्यात आल्याने त्याचाही फायदा गरजूंना होत होता. मुणगे येथील कातकरी समाजालाही लोणे यांनी मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली होती.

समाजाभिमुख कामांमुळे लोणे यांची स्वामी भक्त म्हणून परिसरात ख्याती होती. ते अधूनमधून आचरा शिक्षक कॉलनी येथील मठात रजेच्या कालावधी येत असत. कालही ते सुटीच्या कालावधीत आले होते. तेथून जेवण करून घरी परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, भाऊ असा परिवार आहे. जमेंदर प्रसाद यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, भाऊ, बहीण असा परिवार आहे. सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील, हेड काँन्स्टेबल महेश देसाई तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT