Two Leopards Captured In Shejwali Ratngairi Marathi News  
कोकण

शेजवलीत बिबट्याचे दोन बछडे घरात घुसले अन्... 

सकाळवृत्तसेवा

राजापूर ( रत्नागिरी ) - तालुक्‍यातील शेजवली येथे लाकडाच्या माचाखाली दडून बसलेल्या बिबट्याच्या सुमारे सहा महिन्यांच्या दोन पिल्लांना सुरक्षितपणे पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. गेल्या महिनाभराच्या कालावधीमध्ये शेजवली - कोंड्ये भागामध्ये बिबट्या किंवा त्याच्या पिल्लांना जेरबंद वा आढळण्याची चौथी घटना आहे. 
तालुक्‍यातील शेजवली येथील विजय गुणाजी परवडे यांच्या घरामध्ये सायंकाळच्यावेळी दोन बिबट्याची पिल्ले घुसली. घरातील माणसांसह शेजाऱ्यांनी आरडाओरड केली असता घाबरून बिथरलेल्या या पिल्लांनी घरातून धूम ठोकली. अन्‌ नजीकच्या प्रकाश महादेव मांजरे यांच्या गोठ्यामध्ये असलेल्या लाकडाच्या माचाखाली लपून बसली. 

दरम्यान, बिबट्याच्या पिल्लांबाबतची माहिती शेजवलीचे उपसरपंच मंदार राणे यांनी वनविभागाला दिल्यावर राजापूरचे वनपाल एस. व्ही. घाटगे, वनरक्षक संजय रणधीर, सहाय्यक विजय म्हादये, दीपक म्हादये, दीपक चव्हाण आदी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. लाकडाच्या माचाखाली दडून बसलेल्या पिल्लांना पिंजऱ्यामध्ये वनविभागाने जेरबंद केले. त्यासाठी त्यांना उपसरपंच राणे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ राजेंद्र देवळेकर, सुरेश परवडे, रामचंद्र देवळेकर, विकास परवडे, प्रथमेश परवडे आदींनी सहकार्य केले. 

पिल्लांना जुन्नर येथे पाठविणार 

गत महिन्यामध्ये कुत्र्यांनी केलेल्या पाठलागामुळे शेजवली येथे कळकीच्या बेटावर चढलेल्या बिबट्याच्या पिल्लाची वनविभागाने सुटका केली होती. त्यावेळी सुटका केलेल्या पिल्लासह अन्य एक पिल्लू गुरुवारी (ता. 16) केलेल्या कारवाईमध्ये सापडले. याला राजापूरचे वनअधिकारी एस. व्ही. घाटगे यांनी दुजोरा दिला. या पिल्लांचे भविष्यामध्ये योग्य पद्धतीने संवर्धन आणि संगोपन करण्यासाठी जुन्नर, पुणे येथे पाठविण्याचे वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bajirao Road Murder: पुण्यात कायद्याचा धाकच संपला? बाजीराव रोडवर दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने खून, रस्त्यावर रक्तपात

Kalyan: कुटूंब मजुरीसाठी आले, राहायला जागा नसल्यानं स्टेशनवर झोपले, पण तेवढ्यात चिमूल्यासोबत नको ते घडलं अन्...

PM Narendra Modi: ‘आरजेडीने’ विकासकामे बंद पाडली; पंतप्रधान मोदी, इंडिया आघाडी अनैसर्गिक

Latest Marathi News Live Update : किरकोळ वादातून आकुर्डी परिसरात महिलेकडून चारचाकी वाहनांची तोडफोड

Kartik Purnima 2025: कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार करा 'या' वस्तूचे दान आणि ग्रहदोषातून मुक्ती मिळवा!

SCROLL FOR NEXT