u k return 7 people covid 19 report negative ratnagiri
u k return 7 people covid 19 report negative ratnagiri 
कोकण

रत्नागिरीकरांना दिलासा: युकेतून आलेले सातही निगेटिव्ह, परदेशी प्रवाशांवर करडी नजर 

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी :  युकेमधून चिपळूण, दापोली, देवरूख येथे आलेल्या त्या सात जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे रत्नागिरीकरांना दिलासा मिळाला आहे. कोरोना व्हायरसचे ब्रिटनमध्ये नवीन रूप दिसू लागल्यामुळे भीतीचे वातावरण होते. तिकडून येणाऱ्या सर्वच प्रवाशांवर प्रशासनाकडून करडी नजर ठेवण्यात येत असून ब्रिटनहून आतापर्यंत जिल्ह्यात चौदा प्रवासी आल्याची नोंद झाली आहे. 

नोकरी, व्यवसायानिमित्त लंडनमध्ये असलेले जिल्ह्यातील 9 जण पहिल्या टप्प्यात रत्नागिरीत परतले होते. त्यांचा शोध घेऊन त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कोरोनाच्या बदलत्या प्रकारामुळे परदेशातून येणाऱ्यांचा आरोग्य विभागाकडून तत्काळ शोध घेतला जात आहे. त्यानंतर "युके'हून आणखी सातजण आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेला मिळाली होती. त्यात चिपळूण, दापोली, देवरूख येथील नागरिक समावेश असून त्यांचा शोध घेऊन विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या सातही जणांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. 

दरम्यान, रविवारी सायंकाळपर्यंतच्या 24 तासात नव्याने कोरोना बाधित 14 रुग्ण सापडले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामध्ये रत्नागिरी- 2, दापोली- 1, गुहागर- 1, चिपळूण- 4, संगमेश्‍वर- 3, लांजा येथील 3 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 9 हजार 169 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून 8 हजार 660 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात रविवारी तपासलेल्या एकुण संशयितांपैकी 113 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 59 हजार 182 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दिवसभरात 14 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. 

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT